मुंबई : शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणात एकनाथ शिंदे गटाकडून तसंच भाजप नेत्यांकडून विविध आरोप करण्यात येत आहेत.
दरम्यान, नितेश राणेंच्या टीकेला शिवसेना उपनेत्या संजना घाडी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल, अशा शब्दांत घाडी यांनी राणेंवर टीका केली.
त्या म्हणाल्या, “नितेश राणे आणि निलेश राणे यांचीच पहिल्यांदा नार्को टेस्ट झाली पाहिजे. तसेच, कधी काँग्रेस, कधी भाजप, तर कधी शिवसेनेला तुम्ही शिव्या घातल्या.
“नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल. त्यामुळे याविषयावर बोलायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे.”