निळवंडे कालव्यांच्या कामास आता मुदत वाढ नाही :-उच्च न्यायालयाचे आदेश

0

कोपरगाव-(नानासाहेब जवरे) : उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचा डावा उजव्या कालव्यासाठी ५२ वर्ष उलटली असून हा प्रकल्प ७.९३ कोटीवरून ०३ हजार कोटींवर गेला असल्याने आता जलसंपदा विभागाला कालव्यांच्या कामास कोणतीही वाढीव मुदत मिळणार नाही व न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय आता कोणतीही वाढीव आर्थिक तरतूद करता येणार नसल्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रवींद्र घुगे व न्या.संजय देशमुख यांच्या खंडपीठाने नुकतेच बजावले असल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी हादरले आहेत..त्यामुळे आता वेळकाढूपणा न करता या विभागाला डावा कालवा मार्च अखेर तर उजवा कालवा हा जून अखेर पूर्ण करणे क्रमप्राप्त ठरले आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की ,”निळवंडे हा प्रकल्प ५२ वर्षांपुर्वी सुरू केला. आतापर्यंत या प्रकल्पावर सुमारे २ हजार १६२ कोटी २६ लक्ष रुपये खर्च होऊनही लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे एक एकराचे सिंचन होऊ शकले नाही.यामुळे प्रस्तावित लाभक्षेत्रातील दुष्काळी शेतकरी सुमारे ५२ वर्षांपासून या प्रकल्पाच्या पाण्याची वाट पाहत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तर नगर जिल्ह्यातील प्रशासनावर विसंबून या भागातील शेतकऱ्यांचा ५३ वर्ष उलटत आली आहेत. यात तीन पिढ्यांची वाट लागली आहे निळवंडे कालवा कृती समितीने सन-२००६ पासून या प्रकल्पात लक्ष घालायला सुरुवात केली. औरंगाबाद खंडपीठात ऍड.अजित काळे यांच्या मदतीने जनहित याचिका (१३३/२०१६) दाखल केल्या होत्या. यावर न्यायालयाने आदेश देऊन आर्थिक तरतूद करून सदर प्रकल्प ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.व तसे केंद्र आणि राज्य सरकारांना प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले होते. मात्र यावर्षी अधिकचा पाऊस आणि अन्य अडथळ्यामुळे सदर मुदतीत काम पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळे दि.२१ जुलै २०२२ रोजी राज्याच्या जलसंपदा विभागाने उच्च न्यायालयाकडे डिसेंबर-२०२२ पर्यंत मुदत वाढ मागितली होती. मध्यतंरी राज्य सरकारच्या महसूल विभागाने अकोले आणि संगमनेर तालुक्यातील गौण खनिज खाणी बंद केल्याने सदर कामावर प्रतिकूल परिणाम झाला . जलसंपदा विभागाने वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित मंत्री आणि महसूल विभागाने त्यास प्रतिसाद दिला नाही. यामुळे तीन महिन्यांचा कालावधी वाया गेल्याने सदर मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे निळवंडे कालवा कृती समितीने याबाबत याचिका (क्रं.१३३/२०१६) अन्वये याचिकाकर्ते विक्रांत रुपेंद्र काले व पत्रकार नानासाहेब जवरे आदींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्या.रवींद्र घुगे,न्या.संजय देशमुख यांचेकडे या अड्.अजित काळे यांच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतले होते. यावर न्यायालयाने याबाबत गौण खनिज उपलब्ध करून त्याचा अहवाल २१ डिसेंबर २०२२ रोजी दाखल करण्याचे निर्देश दिले होते.तसेच न्यायालयाने राज्य सरकारला नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यसरकारच्या प्रतिज्ञा पत्रावर बुधवार दि.१८ जानेवारी रोजी सुनावणी पूर्ण झाली. त्यात वरील आदेश न्या.घुगे व न्या.देशमुख यांच्या खंडपीठाने दिले आहेत. संबंधित कामाचा आढावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने दि.०५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ०४.३० वाजता सुनावणी ठेवली आहे. सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने समितीचे वकील व शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अँड .अजित काळे यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. तर राज्य सरकारी पक्षाचे वतीने अभियोक्ता बी.आर.गिरासे यांनी काम पहिले होते.सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,भिवराज शिंदे,रावसाहेब थोरात,अड्.योगेश खालकर,जलसंपदाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पुंजाजी माने आदी उपस्थित होते. त्याआदेशाची प्रत नुकतीच कालवा कृती समितीस मिळाली .
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष-गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष-एस.यू.उऱ्हे सर,व संजय गुंजाळ,सचिव-कैलास गव्हाणे,संघटक-संदेश देशमुख,सुधाकर शिंदे,वामनराव शिंदे,संघटक नानासाहेब गाढवे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,दत्तात्रय चौधरी,विठ्लराव देशमुख,संतोष तारगे,बाबासाहेब गव्हाणे,रंगनाथ गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,माधव गव्हाणे,रामनाथ ढमाले सर,तानाजी शिंदे,ज्ञानदेव शिंदे गुरुजी,सुधाकर शिंदे,विक्रम थोरात,राजेंद्र निर्मळ,भरत शेवाळे,कौसर सय्यद,दौलत दिघे,आप्पासाहेब कोल्हे,अड.योगेश खालकर,सचिन मोमले,महेश लहारे,रावसाहेब मासाळ,नवनाथ शिरोळे,सोमनाथ दरंदले,वाल्मिक नेहे,नामदेव दिघे,संतोष गाढवे,अशोक गांडूळे,शरद गोर्डे,शिवाजी जाधव,दत्तात्रय आहेर,शिवनाथ आहेर,गोरक्षनाथ शिंदे,दत्तात्रय थोरात,वसंत थोरात,रावसाहेब सु.थोरात,अशोक गाढे,ज्ञानदेव पा.हारदे,बाळासाहेब चि.रहाणे,बाळासाहेब सोनवणे,आबासाहेब सोनवणे,नरहरी पाचोरे,रामनाथ पाडेकर,दगडू रहाणे,भाऊसाहेब चव्हाण,वाल्मिक नेहे,अलिमभाई सय्यद,शब्बीरभाई सय्यद आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

या प्रकल्पासाठी वर्तमानात जलसंपदाकडे एकूण २९५ तर नाबार्ड कडून आलेला ७० असा एकूण ३६५ कोटी रुपयांचा निधी शिल्लक असून आगामी काळात हा प्रकल्प जलसंपदा विभागाने वेळेत पूर्ण करावा अशी अपेक्षा निळवंडे कालवा कृती समितीने व्यक्त केली आहे.व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे व समितीचे वकील व शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अँड.अजित काळे यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here