शिवसेनेच्यावतीने जैन ओसवाल पतसंस्थेच्या नूतन संचालकांचा सत्कार
नगर – जैन ओसवाल पतसंस्थेने अल्पावधीतच चांगल्या कामामुळे आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला विशेषत: व्यापारी वर्गाला अर्थसहाय्य देत त्याना उभारी देण्याचे काम केले आहे. चांगल्या संचालकांमुळे पतसंस्था दिवसेंदिवस प्रगती साधत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी मंडळाने केलेल्या चांगल्या कामामुळे सभासदांनी पुन्हा त्यांना संधी दिली आहे. नूतन संचालकांनी सभासदांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करुन पतसंस्थेच्या लौकिकात भर टाकण्याचे काम करावे. तसेच छोट-मोठे व्यापारी, सर्वसामान्यांना आपल्या गरजू पुर्ण करण्यासाठी कर्जरुपी अर्थसहाय्य करुन त्यांना उभारी देण्याचे काम करावे. आपल्या चांगल्या कामात आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
शिवसेनच्यावतीने जैन ओसवाल पतसंस्थेच्या नूतन संचालकांचा शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नूतन संचालक संतोष गांधी, समीर बोरा, अभय पितळे, शैलेश गांधी, चेतन भंडारी, विनित बोरा, अॅड.आनंद फिरोदिया, शरद गोयल, पंडितराव खरपुडे, विनय भांड आदि उपस्थित होते.
याप्रसंगी समीर बोरा म्हणाले, स्व.सुवालालजी गुंदेचा यांनी समाजातील प्रत्येक घटकांचा विकास व्हावा, त्यांची पत निर्माण व्हावी, यासाठी या पतसंस्थेची उभारणी केली. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही नूतन संचालक पतसंस्थेच्या उन्नत्तीसाठी काम करु. सर्वसामान्यांसाठी आकर्षक योजना राबवून त्यांची प्रगती साधण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न राहील. आजच्या सत्कारामुळे आम्हास मिळणार पाठबळ हे आमचा उत्साह वाढविणारे असल्याचे सांगितले.
यावेळी संतोष गांधी यांनी पतसंस्थेच्या कार्याची माहिती देऊन संचालकांची ओळख करुन दिली. शेवटी विनित बोरा यांनी आभार मानले.