नेवासे : माजी मंत्री,आमदार बाळासाहेब थोरात वं माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी नेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पटारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना सदिच्छा व शुभेच्छा दिल्या .
यावेळी थोरात म्हणाले की अण्णासाहेब पटारे हे मूळचे काँग्रेसचे असून युवक काँग्रेसचे बारा वर्षे त्यांनी नेवासा तालुक्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे.म्हणून त्यांच्या पाठीमागे दांडगा जनसंपर्क आहे. याचा फायदा नेवासा तालुका काँग्रेसला नक्कीच होईल असे मत आ. थोरात यांनी व्यक्त केले.
यावेळी समवेत अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी आनु.जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, जिल्हा काँग्रेसचे मुख्य उपाध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत लुनिया, राहता विधानसभा काँग्रेसचे नेते सुरेश थोरात,
यावेळी आधी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.