कोपरगाव /: Prime Minister Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी गुरुवारी (२६ ऑक्टोबर)shirdi शिर्डी दौऱ्यावर आले असता, माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या Snehalata Kolhe स्नेहलताताई कोल्हे यांनी काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळावर तर Vivek Kolhe विवेक कोल्हे यांनी शिर्डी येथील हेलिपॅडवर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी शिर्डी येथील श्री साईबाबा Sai Baba समाधी मंदिरातील वातानुकूलित नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन, उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे जलपूजन व धरणाच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण, काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन सुसज्ज टर्मिनल इमारतीचे व अन्य विकासकामांचे भूमिपूजन, महाराष्ट्रातील ८६ लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना आर्थिक लाभ देणाऱ्या राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा १७१२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करून शुभारंभ, अहमदनगर येथील शासकीय रूग्णालयातील आयुष हॉस्पिटलसह आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल व वायू आदी क्षेत्रातील सुमारे १४ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी यांचे खास विमानाने शिर्डी विमानतळावर आगमन झाले असता, सौ कोल्हे यांनी काकडी येथील शिर्डी विमानतळावर तर विवेक कोल्हे यांनी शिर्डी येथील हेलिपॅडवर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
यावेळी स्नेहलताताई कोल्हे व विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही स्वागत करून कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे पाटील, आ. राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आदींसह खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2023/10/IMG-20231026-WA0077-1024x656.jpg)
यावेळी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, विश्वनेता नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भारताला एक सक्षम, दूरदर्शी, कुशल, कर्तृत्ववान व समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारे कणखर पंतप्रधान लाभले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भारताचे नाव जगभरात उंचावले आहे. गेल्या ९ वर्षांत त्यांनी सेवा, सुशासन व गोरगरिबांचे कल्याण यावर भर देत ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र अवलंबत जनसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारताची सर्व क्षेत्रात अतिशय वेगाने प्रगती होत असल्याचे कोल्हे म्हणाल्या.