जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या गरडाचे पाटोदा ग्रामपंचायत मध्ये सत्तापरिवर्तन झाले असून सरपंचपदी छाया कवादे यांची बिनविरोध निवड करण्यात आली भाजपाचे शाखा अध्यक्ष सदाशिव कवादे यांच्या ते मातोश्री आहेत.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य धनंजय काळाने, शांतीलाल शिरसाट, प्रदीप माने, सचिन शिंदे, लक्ष्मीकांत पारवे, पांडुरंग शिंदे, अशोक गव्हाणे, दिनकर टापरे, पंढरीनाथ शिकारे, उपस्थित होते. यावेळी सदाशिव कवादे म्हणाले की पाटोदा, खामगाव, भवरवाडी या गावांची ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, माजी मंत्री आ. राम शिंदे यांच्या माध्यमातून पाटोदा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्य व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून काम करत राहिल यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, पाटोदाचे माजी सरपंच समीर पठाण, माजी सरपंच सुनील निंबाळकर, गफ्फार पठाण, बिबीशन कवादे, गणेश भाकरे, दत्ता भाकरे, शरद कवादे, उद्योजक मुन्ना शेख, अनिल शितोळे, देवा मोरे, ताजू शेख, इब्राहिम शेख, रज्जाक शेख, दादा मेंढकर, आजिनाथ भवर, हनुमान जाधव, विष्णू गंडाळ, राजू पठाण, स्वप्नील मुरूमकर, सिद्धार्थ थोरात, अंगद गव्हाणे, मुजीब पठाण, डॉ. अरविंद तांबारे, महेश कवादे, विलास कवादे, श्रीकृष्ण राऊत, आदी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ना. जितेंद्र सरोदे, पोलीस कॉ. कोठुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जोशी, कामगार तलाठी समीर शेख, ग्रामविकास अधिकारी विनोद खुरंगुळे यांनी काम पाहिले यावेळी नवनिर्वाचित संरपच छाया कवादे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला
चौकट – या वेळी बोलताना कवादे म्हणाले की आमच्या पाटोदा गावात चाळीस ते पन्नास वर्षे नंतर आम्हाला व आमच्या कवादे कुटूंबाला संरपच पद मिळाले असुन आम्हाला एक वेगळाच आंनद झाला आहे मी व माझे गवादे कुंटूब पाटोदा गावाचे सर्व ग्रामस्थ व सर्व ग्रा.सदस्य यांचे मनापासून अभिनंदन करतो मी येथून पुढे गावात जातीने लक्ष घालून गोरगरीब, कष्टकरी शेतकरी यांचे शासन दरबारी काय काम असतील ते मी पाठपुरावा करून यांना न्याय देण्याचा काम करत राहिल गावात कधीच कोणाची अडवणुक करणार नाही योग्य ते न्याय सर्वाना देईल कोणाची अडचण असेल ते मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल
(सदाशिव कवादे)