पानी फाउंडेशनचे पहिले बक्षीस मिळवून फार्मर कपवर कोरले पेमगिरीच्या रणरागिनींनी आपले नाव 

0

संगमनेर : चंद्रकांत शिंदे 

ज्येष्ठ सिने अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२२ या उपक्रमात भाग घेत संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या रणरागिनी कृषी उत्पादक महिला गटाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावत फार्मर कपवर आपले नाव कोरले.

पुण्याच्या बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सिने अभिनेते तथा पानी फाउंडेशनचे प्रमुख आमिर खान,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,किरणराव, फाउंडेशनचे सिओ सत्यजित भटकळ,पानी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक  डॉ  अविनाश पोळ यांच्या हस्ते एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन रणरागिनी कृषी उत्पादक महिला गटाला सन्मानित करण्यात आले.

           पानी फाउंडेशनने फार्मर कप स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेमध्ये गट शेतीला प्राधान्य देऊन कमी खर्चात अधिकचे उत्पादन घेणे, विषमुक्त शेती करणे, गटाच्या माध्यमातून शेती करुन मजुरीवरचा खर्च कमी करणे. एकत्र निविष्ठा खरेदी करणे व एकत्र शेत माल विक्री करणे अशा बाबींसाठी फार्मर कप स्पर्धेचे आयोजन केले होते. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील रणरागिणी कृषी उत्पादक महिला गटाने  सोयाबीन, कांदा व मका या तीन पिकांसह  फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन अतिशय चांगले कामे करुन तिन्ही पिकांचे चांगले उत्पादन घेतले आहे.

विशेष म्हणजे सोयाबीन, मका, कांदा हे तीनही पिके विषमुक्त पिकवले आहेत. या गटाने केलेल्या कामाची पानी फाउंडेशन टीमने तपासणी करुन या गटाला रविवारी पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात गौरविण्यात आले. रणरागिणी गटाच्या निमंत्रक अर्चना वनपत्रे, योगिता दुर्गुडे, सुवर्णा डुबे, सचिव पुष्पा गोडसे यांनी पुढाकार घेऊन महिलांना एकत्र करुन गट शेतीची चळवळ बनवून नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन पानी फाउंडेशन व कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांचे मार्गदर्शन घेऊन चांगले उत्पादन घेतले. त्यांच्या याच चांगल्या कामाचा परिपाक त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून गेला. हा गट तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षिस घेऊन फार्मर कपचा पहिला  मानकरी ठरला आहे.

           तालुक्यातील पेमगिरी व सावरगाव तळ येथील गटास अमेरिका येथील ओरिगॉन विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्रज्ञ प्रा. अंड्रयू  मिल्सन व प्रा. शैलीस यांनी भेट देऊन गटाने केलेल्या कामाची पाहणी करुन कौतुक केले होते. फार्मर कप स्पर्धेमध्ये तालुक्यातील पेमगिरी, सावरगाव तळ, मांची, खंदरमाळवाडी, भोजदरी, पिंपळगाव देपा, मोधळवाडी, कुंभारवाडी, खरशिंदे, कणसेवाडी, म्हसवंडी, पिंपळगाव माथा, सायखिंडी व पोखरी  बाळेश्वर या गावांतील साठ गटांनी सहभाग घेऊन शेतीमध्ये पानी फाउंडेशन व शास्त्रज्ञाच्या मदतीने उत्पादन वाढीसाठी विशेष कार्य केले.रणरागिणी गटास उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी, कृषिसहाय्यक भारती मोरे,पानी फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ,  विभागीय समन्वयक विक्रम फाटक, संगमनेर तालुका समन्वयक राजेंद्र जाधव 

यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. रणरागिनी कृषी उत्पादक महिला गटाच्या या यशाबद्दल माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात,   इंद्रजित थोरात, उद्योजक  रोहित डुबे, द्वारकाताई डुबे, शांताराम डुबे, माजी सरपंच सोमनाथ गोडसे यांनी अभिनंदन केले आहे. पानी फाउंडेशनच्या कार्यात भीमाशंकर पांढरे, विनायक गोडसे, सतिष कोल्हे, अ‍ॅड. स्वप्निल कोल्हे, दिपक दुर्गुडे,शुभम वनपत्रे यांचा सक्रिय सहभाग असतो. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here