पुरवठा अधिकाऱ्याच्या खुर्चीचा स्वस्त धान्य दुकानातील सेल्समनने घेतला ताबा !

0

          देवळाली प्रवरा / प्रतिनिधी : राहुरी महसूल विभागातील विभाग या ना त्या कारणाने प्रकाश झोतात येत असतात.पुरवठा शाखेच्या कार्यालयात पुरवठा अधिकाऱ्याच्या खुर्चीचा एका स्वस्त धान्य दुकानातील सेल्समन ने ताबा घेतल्याची चर्चा आहे. राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील स्वतःला राजा समजणारा हा सेल्समन या खुर्चीवर अनाधिकृतपणे बसुन आपले उखळ पांढरे करत आहे. सदर बाबीकडे महसूल विभाग देखील सफशेल दुर्लक्ष करत आहे.तर राहुरी फँक्टरी भागातील एक सेल्समन मी अधिकाऱ्यांच्या किती जवळचा असल्याचे दाखवून अनेकांना गंडा घालण्याचे काम करीत आहे.पुरवठा विभागही उघड्या डोळ्याने पाहुण हि काही हि कारवाई करु शकत नाही.

          राहुरी महसुल विभागातील पुरवठा शाखेच्या कार्यालयात पुरवाठा निरीक्षक यांच्या गैरहजेरीत त्यांच्या खुर्चीवर वळण परिसरातील ह्या सेल्समनने गेल्या काही काळापासून ताबा घेतला आहे. तर राहुरी फँक्टरी येथिल एक सेल्समन राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने अधिकाऱ्यांवर छाप पाडून पाहिजे तशी कामे करुन घेत आहे.त्यातुन माञ स्वतःसाठी माया कमविण्याचे इसरत नाही. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित वळण येथिल सेल्समन खुर्चीचा फायदा घेत असल्यांची जोरदार चर्चा असुन यात चांगल्या अधिकाऱ्याची  नाहक बदनामी होत असल्याची देखील चर्चा आहे.

               हा सेल्समन पुरवठा विभागातील काही कामे करत असुन आपले उखळ पांढरे करत आहे. वास्तविक पहाता तालुक्यातील रेशन कार्डचे प्रकरणे, गृह चौकशी, दुकान तपासणी, तक्रारी निवारन, रेशनकार्ड वरील नाव कमी करणे किंवा नावे समाविष्ट करणे यांसारखे कामे हे अधिकारी करत असतात. मात्र हा महामाग अधिकाऱ्याच्या गैरहजेरीत मोठ्या दिमाखात या खुर्चीवर बसुन वावरत असतो. तालुक्यातून आलेल्या गोर-गरीब, वृद्ध, शेतकरी नागरीकांकडून रेशनकार्ड तसेच स्वस्त धान्य दुकानदारांकडून माया गोळा करत असल्याची चर्चा आहे. या महाभागाला कोणत्या अधिकाऱ्यांचा आशिर्वाद आहे का ?

                 पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसुन खराजरोसपणे कामे करण्याचा त्याला अधिकार आहे का? दररोज या कार्यालयात तो कुठली कामे करतो? करतो तर त्यांची काही अधिकृत रक्कम शासनाच्या तिजोरीत भरतो का ? रेशनकार्ड धारकांकडून रक्कम वसुल करण्याचे त्याला अधिकार आहेत का? असे अनेक सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.राहुरी फँक्टरी येथिल एक दुकानदार नागरिकांना मोठ्या प्रमाणात गंडा घालण्याचे काम करीत आहे. कर्तव्यदक्ष राहुरीच्या तहसीलदारांनी याची कसुन चौकशी करून अशा महाभागावर कारवाई करावी व दलाल मुक्त तहसील विभाग करावा अशी मागणी केली जात आहे.

राहुरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांना मिळणा-या धान्यांची ऑनलाईन डाटा प्रक्रिया याच टेबलवर केल्या जातात. सदर प्रक्रिया निशुल्क करण्याच्या आदेश असताना देखील हा महाभाग तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराकडून देखील काही रक्कम राजरोजपणे वसूल करत असल्याची देखील चर्चा आहे. तसेच रेशन कार्डमधे मध्ये नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, आधार लिंक करणे, संगणकीकृत करणे आदि प्रक्रिया निशुल्क करण्याचे आदेश असताना देखील प्रत्येक लाभार्थीकडून हा महाभाग माया गोळा करत असल्याची चर्चा आहे.

तालुक्यातील पुर्व भागातील एका गावाच्या सोसायटीच्या ताब्यात असलेल्या स्वस्त धान्य दुकानातील संलग्न गावातील लाभार्थी या महाभागाने स्वतंत्र केले असुन एका आदिवासी गावात  स्वस्त धान्य दुकान विभक्त करण्याचा घाट घातला आहे. त्याच्या या कारनाम्याने या गावातील त्या सेवा सोसायटीचा नफा कमी झाल्याने त्यांचा फटका देखील या सोसायटीला बसला आहे. ज्या आदिवासी भागात हे स्वस्त धान्य सुरू केले तेथील नागरीकांच्या देखील मोठ्या प्रमाणात तक्रारी असुन लवकरच तेथील नागरिक या सेल्समनची तक्रार वरीष्ठांकडे करणार असल्याचे समजले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here