कोपरगाव ( वार्ताहर)श्री मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल , पोहेगाव येथे गुरुवार दिनांक २९/०६/२३ रोजी आषाढी एकादशी निमित्त श्री मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल च्या ८०० विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. बाळ गोपालानी विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या तसेच विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून विठ्ठल नामाच्या गजराने पोहेगाव नगरी गाजवली.
पर्यावरण संरक्षण ,पाणी वाचवा ,स्त्रीभृण हत्या थांबवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, प्लास्टिकचा वापर टाळा, इत्यादी संदेश देऊन सामाजिक प्रबोधन देखील केले.
या कार्यक्रमासाठी शाळे शाळेच्या संचालिका वैशाली साळुंखे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता विसे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रमाचे आयोजन संदीप जोरी सर पर्यवेक्षिका सौ रेणुका औताडे, वैशाली वर्पे यांनी अतिशय सुरेख करून माधुरी होन ,शुभांगी मुसळे, मेघा होन, अर्चना देशमुख, अनिता जाधव, सुरेखा लांडगे, अर्चना देशमुख, अश्विनी होन, विद्या रोहमारे , व इतर शिक्षकांनी कार्यक्रम पार पाडण्यास अतिशय मोलाचे सहकार्य केले.
या एकादशीला पोहे गावातील नामांकित डॉक्टर मेहत्रे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खिचडी प्रसादाचे वाटप केले. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विलासराव साळुंखे यांनी त्यांचे आभार मानत शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.या सोहळा दरम्यान विद्यार्थ्यांनी लाठीकाठी च्या प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन करून दांडपट्टा ,चक्र, काठ्या लीलया फिरवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी पाऊली द्वारे वारकऱ्यांसारखे विविध खेळ करून रिंगण करून खऱ्या दिंडीचा अनुभव गावकऱ्यांना दिला.