पोहेगाव-अंतापुर ताराबाद पायी दिंडी-पालखी सोहळ्यात भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन

0

कोपरगाव :कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ते श्री क्षेत्र अंतापुर ताहराबाद या तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पायी दिंडी व पालखी सोहळ्यामध्ये भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पालखी चालक गुरुमाऊली रमेश महाराज औताडे यांनी केले आहे.

जय हरी गंगामाय हरी ओम गुरुवर्य ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा व ब्रह्मलीन गंगाप्रसाद सोनार बाबा व गुरुवर्य रमेशगिरी महाराज , सदगुरू मुरलीधर महाराज औताडे यांच्या आशीर्वादाने

पालखी चालक रमेश महाराज औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी पालखीचे प्रस्थान पोहेगाव येथून अंतापुर ताहराबाद कडे होणार आहे. गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता दोन्ही गडाचे देवदर्शन घेऊन व सकाळी 11 वाजता महाप्रसाद घेऊन दुपारी 2 वाजता पालखीचा परतीचा प्रवास होणार आहे. या पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे हे 43 व्या वर्षी आहे.

पालखी व पादुका पूजन महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. विना पूजन वैष्णवानंद गर्जे महाराज, काठीपूजन स्वाधी शारदानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते होईल. 

या पालखी सोहळ्यामध्ये शिस्तीला विशेष महत्त्व दिले असून दररोज सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा नाश्ता व रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जेवण विविध ठिकाणी भाविकांकडून देण्यात येणार आहे . या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या बाहेर गावच्या वारकऱ्यांनी 31 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता औताडे वस्ती पोहेगाव येथे मुक्कामी यावे व जास्तीत जास्त भाविकांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रमेश महाराज औताडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here