प्रभू श्रीरामाच्या पावनभूमीत रंगला ‘होम मिनिस्टर’ चा खेळ

0

आ. आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित

कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चास नळीत महिला भगिनींचा एकमेव आवडता कार्यक्रम अर्थात ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाला महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देवून विविध स्पर्धेत सहभाग घेत गणेशोत्सवाचा आगळा वेगळा आनंद साजरा केला. या कार्यक्रमाची चासनळीसह कारवाडी, हंडेवाडी, मंजूर, चासनळी, वडगाव, बक्तरपूर, मोर्विस, धामोरी, मायगाव देवी, सांगवी भुसार आदी गावांतील महिलांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.   

गणेशोत्सवानिमित्त कोपरगाव मतदार संघातील विविध गावांमध्ये आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून सौ.पुष्पाताई काळे यांच्या मागर्दर्शनाखाली ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा श्री गणेशा चास नळीत करण्यात आला.तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनींनी प्रत्येक खेळात सहभागी होवून स्पर्धेतील विजयी स्पर्धकांसाठी ठेवण्यात आलेली विविध बक्षीसे पटकाविली.यामध्ये पहिले बक्षीस स्मार्ट टि.व्ही.,दुसरे बक्षीस मायक्रो ओव्हन, तिसरे बक्षीस गॅस शेगडी,चौथे बक्षीस मिक्सर, पाचवे बक्षीस टेबल फॅन, सहावे बक्षीस इस्त्री, सातवे बक्षीस डीनर सेट, आठवे बक्षीस लेमन सेट, नववे बक्षीस स्टील भांडे सेट, दहावे बक्षीस कप सेट या बक्षिसांचे विजेत्यांना जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आ. आशुतोष काळे म्हणाले की, सातत्याने घर, संसार, प्रपंचामध्ये व्यस्त असणाऱ्या माता भगिनी धार्मिक कार्यात देखील तेवढ्याच अग्रेसर असतात. गणेशोत्सव हा सर्वांसाठीच अतिशय आनंदाचा सण असून माता भगिनींना भक्तीबरोबरच आपले कला, गुण व्यक्त करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.

यावेळी स्पर्धेतील प्रथम विजेत्या सौ.अश्विनी गणेश नागरे ठरल्या तर द्वितीय बक्षीस सौ.निकिता निलेश तीरसे, तृतीय बक्षीस सौ.वंदना दीपक गावंड,चतुर्थ बक्षीस सौ.उज्वला चैतन्य सोनवणे, पाचवे बक्षीस सौ.पुष्पा भाऊसाहेब नाईकवाडे, सहावे बक्षीस सौ. मंगला कैलास बर्डे, सातवे बक्षीस सौ.वृषाली किरण वालझडे, आठवे बक्षीस सौ.मुक्ताबाई बाजीराव गायकवाड, नववे बक्षीस सौ.दीप्ती श्रीकांत तीरसे तर दहावे बक्षीस सौ.नंदा ज्ञानदेव बनकर यांनी मिळविले. यावेळी सौ.चैतालीताई काळे म्हणाल्या की, विविध कार्यक्रम समारंभाच्या निमित्ताने महिला भगिनीशी संवाद होत असतो. मात्र होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला भगिनींशी जो संवाद होतो, त्यावेळी निर्माण होणाऱ्या हास्य विनोदातून जो आनंद महिला भगिनींच्या चेहऱ्यावर येतो तो आनंद मनाला अतिशय समाधान देणारे असते. महिला भगिनींसाठी काळे परिवार नेहमीच पुढे असतो.

आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाचा विकास तर केलाच आहे परंतु त्याचबरोबर महिलांसाठी देखील काहीही करायची त्यांची सदैव तयारी असते.यापुढील काळातही आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्याने असे विविध उपक्रम सातत्याने राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रत्येक महिलेशी आपुलकीने बोलून हस्तांदोलन करतांना त्यांच्यामध्ये बसूनच सौ.चैतालीताई काळे यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांच्या प्रतिक्रिया ————

आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासाबरोबरच महिलांचा आवडता ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम ठेवल्याबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले.‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आम्ही फक्त टी.व्ही.वर पाहत होतो. मात्र चास नळी व परिसरातील ग्रामीण भागातील महिलांना प्रत्यक्षात या कार्यक्रमात सहभागी होता आले याचा आम्हाला मोठा आनंद वाटतो. मायगाव देवी येथील सौ.मुक्ताबाई गायकवाड या महिलेने सांगितले की, पंचवीस वर्षापूर्वी लग्न होवून मायगाव देवी गावात आले तेव्हापासून ज्या रस्त्याचे काम झाले नव्हते त्या रस्त्याचे काम आ.आशुतोष काळे यांनी पूर्ण केले त्यामुळे आमच्या अडचणी दूर झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here