फुटबॉल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे सुयश.

0

उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )सेव्हेन अ साईड फुटबॉल इंटरनेशनल फेडेरेशन, बुद्धा स्पोर्ट्स अकॅडेमी काठमंडू नेपाल व जया मल्टिपल कॉलेज काठमान्डु नेपाल ह्यांचा संयुक्त विद्यमाने इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय सेव्हेन अ साईड फुटबॉल स्पर्धा नेपाळ 2023 येथे घेण्यात आली.

ही स्पर्धा 25 ते 26 ऑगस्ट या कालावधीत काठमान्डु येथे घेण्यात आले. नेपाळमध्ये झालेल्या ह्या ‘इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत’ नेपाळचे तीन संघ आणि भारतातील तीन संघ (महाराष्ट्र, दिल्ली आणि आसाम) यासह महाराष्ट्र युईएस स्कूल उरणच्या एका संघाने भाग घेतला होता. यूईएस उरण संघाने नेपाळच्या दोन संघांना पराभूत केले परंतु, कटारी फुटबॉल क्लब नेपाळ संघाकडून पराभूत झाल्यामुळे नेपाळ संघाला प्रथम स्थान मिळाले आणि यूईएस उरण संघाला द्वितीय क्रमांक मिळाला. ही अतिशय चुरशीची स्पर्धा होती.

फुटबॉल हा नेपाळमध्ये खेळला जाणारा सर्वात लोकप्रिय खेळ आहे, ज्यामध्ये यूईएसच्या मुलांनी त्यांच्या दोन संघांना पराभूत करून पुढे गेले, परंतु त्यांना एका संघाकडून पराभव स्वीकारावा लागला आणि दुसरा क्रमांक मिळाल्याने संघाचा आनंद अमर्याद होता. नेपाळमध्ये दुसरे स्थान मिळवणे ही आमच्या मुलांसाठी एक अनोखी कामगिरी आहे, असे संघाचे मुख्य प्रशिक्षक प्रवीण संग्राम तोगरे सर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here