नगर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि.14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 5 वाजता बौद्ध संस्कार संघाच्यावतीने ‘भीम पहाट’ कार्यक्रमाचे चेतना लॉन, छत्रपती संभाजीनगर रोड, नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भीमप्रेमी गीत गायक संगीत सितारे परिवार हे बहारदार भीम गीते सादर करणार आहेत.
तरी या कार्यक्रमास भीमप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बौद्ध संस्कार संघाच्यावतीने भाऊसाहेब देठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो.98815311188 या क्रमांकावर संपर्क साधावा.