नगर –भारताची राज्य घटना ही जगातील एक आदर्श घटना मानली जाते. ती आदर्श आहेच परंतु तिचे एवढे वर्णन पुरेसे नाही. भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक इतिहास लक्षात घेता राज्यघटनेची उद्दिष्ट्य व ती साध्य करण्याचे मार्ग पाहिल्यास भारतीय राज्य घटना ही एक ‘सामाजिक क्रांती’ म्हणावी लागेल.
राज्य घटना तयार करण्याच्या कार्यात अति महत्वाची भुमिका बजावणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर खर्या अर्थाने भारतीयांचे उद्धारकर्ते ठरले, असे प्रतिपादन भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी केले.
संविधान दिनानिमित्त भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी मुंबई येथील चैत्यभुमी येथे जाऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी तुषार लवांडे, तेजस्वीनी लवांडे, अरुणा चाबुकस्वार आदि उपस्थित होते.