कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहीद जवान अमोल पाटील यांच्या वीर पत्नी गावची कन्या राजश्री पाटील यांच्या हस्ते सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय येथे आणि जिल्हा परिषद शाळा भोजाडे येथे ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सैन्य दलात सेवेत रुजू असणारे गावचे सुपुत्र मेजर अमोल सिनगर हे देखील हजर होते. वीर पत्नी व सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे अनोखे उपक्रम करत भोजाडे गावाने एक नवा आदर्श समाजापुढे मांडला आहे. तसेच गावचे लोकनियुक्त सरपंच सुधाकर वादे यांनी आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांना गावकऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत गाव विकासासाठी सर्वांनी लोक सहभाग नोंदवत गाव विकास साधण्यास मदत करावी असे आव्हान विनंती त्यांनी यावेळी केली . ते पुढे म्हणाले की आम्ही सर्वजण गाव विकासासाठीच प्रयत्नशील असून ग्रामस्थांनी लोकसहभाग दर्शवत ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे. यावेळी तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान राजकीय सामाजिक देशभक्ती शैक्षणिक क्षेत्रात बहुतांश वेळ देणारे धडाडीचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, सुशीलामाई काळे माध्यमिक विद्यालयाचे शैक्षणिक व सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे अध्यक्ष भाऊसाहेब सिनगर, गावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सुधाकर वादे, उपसरपंच वाल्मीक सिनगर, ग्रामपंचायत तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य हायस्कूलचे मुख्याध्यापक ठाकरे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक ढेपले सर सर्व शाळांचे शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी, ग्रामस्थ , विजय साबळे, विक्रम मंचरे, बाळासाहेब सिनगर, सलीम शेख ,जगदीश गलांडे ,मिथुन गायकवाड , दिलीप सिनगर, आनंद सिनगर, मच्छिंद्र दिघे, सचिन घनघाव,संतोष सिनगर, बाळासाहेब मंचरे ,ग्रामसेवक गोसावी ,यांच्यासह भोजाडे गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.