मतदारसंघाने मला दिलेले प्रेम भारावून टाकणारे – डॉ.सुधीर तांबे

0

सत्यजीत तांबे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे मतदारांना आवाहन

संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील 
नाशिक पदवीधर मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून १४ वर्षे काम करताना मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, स्नेह दिला यामुळेच मला काम करण्याचे बळ मिळाले. या अकृत्रिम स्नेहाबद्दल मी कृतज्ञ आहे. मी भावनिकदृष्ट्या मतदारांशी जोडलेलो आहे, अशा शब्दात डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवाय नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सत्यजीत तांबे यांच्या पाठीशी उभे राहा. सत्यजीत तांबे हे केवळ माझा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी पुढे आणलेले उमेदवार नाहीत. त्या कारणास्तव त्यांना निवडून देताना ते सर्वार्थाने सुयोग्य उमेदवार आहेत म्हणून निवडून द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
            आमदारकीच्या कार्यकाळात शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसह इतर अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता संबंधित ठिकाणी पाठपुरावा केला. वर्षातले ३६५ दिवस वेळोवेळी मतदारांना नियमितपणे भेटत राहिलो, असे डॉ. सुधीर तांबे म्हणाले. मतदारसंघातील शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, खासगी नोकरदार, शेतकरी आणि विविध प्रोफेशनल्स अशा विविध क्षेत्रातील पदवीधरांसाठी २४ तास उपलब्ध होतो. पाच जिल्ह्यांतील ‘जामनेर ते पारनेर’ इतक्या मोठ्या मतदारसंघात काम करताना अनेक आव्हाने समोर होती. या आव्हानांचा मुकाबला करत विविध प्रश्न सोडविण्यासाठी विधानपरिषद, मंत्रालय आणि शासनाच्या विविध विभागात वेळोवेळी आवाज उठवला, अशी माहिती त्यांनी दिली. १४ वर्षे काम करताना मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, स्नेह दिला यामुळेच मला काम करण्याचे बळ मिळाले. या अकृत्रिम स्नेहाबद्दल कृतज्ञ आहे. मी भावनिकदृष्ट्या मतदारांशी जोडलेलो आहे, अशा शब्दांत डॉ. सुधीर तांबे यांनी भावना व्यक्त केल्या.दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सत्यजीत तांबे यांच्या पाठीशी उभे राहा. सत्यजीत तांबे हे केवळ माझा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी पुढे आणलेले उमेदवार नाहीत. त्या कारणास्तव त्यांना निवडून देताना ते सर्वार्थाने सुयोग्य उमेदवार आहेत म्हणून निवडून द्या, असे आवाहनही डॉ. तांबे यांनी मतदारांना केले आहे. सत्यजीत यांची सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कारकीर्द २२ वर्षांची आहे. या काळात त्यांनी संघटनात्मक पातळीवर खूप मोठे काम केलेले आहे’ असे त्यांनी सांगितले.सत्यजीत तांबे यांनी राज्यशास्त्र आणि व्यवस्थापन शास्त्रातील पदवी घेतलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी स्नेह असण्याबरोबरच त्यांचा देश विदेशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी विशेष स्नेह आहे. विविध भाषेतील पुस्तकांचे वाचन, तरुणाईसाठी प्रेरक वक्ता ही देखील त्यांची एक ओळख आहे. जगभरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींपासून आपल्या ग्रामीण भागातील जनजीवनाचा सत्यजीत तांबे यांना सखोल अभ्यास आहे. त्यामुळेच एक पदवीधर म्हणून आपले विविध प्रश्न सोडविण्यासाठी, आपल्या आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी ते सर्वार्थाने सुयोग्य उमेदवार आहेत. ‘माझा वारसा नाही तर कामाचा वसा पुढे नेण्यासाठी सत्यजीतवर आपण विश्वास दाखवावा’, असे डॉ. तांबे म्हणाले.

डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन
सत्यजीत तांबे हे केवळ माझा राजकीय वारसा पुढे चालविण्यासाठी पुढे आणलेले उमेदवार नाहीत. त्या कारणास्तव त्यांना निवडून देताना ते सर्वार्थाने सुयोग्य उमेदवार आहेत म्हणून निवडून द्या. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here