देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत संगणकाचे धडे गिरविले Marathi medium computer literate; जात असल्याने पालक वर्गांचा कल इंग्रजी माध्यमाकाकडे वाढत आहे.आपल्या शाळेत सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा आहे.त्या संगणकाचा उपयोग करुन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पञकार राजेंद्र उंडे यांनी केले आहे.
देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परीषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेतील जेष्ठ शिक्षक सुरेंद्रकुमार जासुद यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानिमित्त जासुद यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्या प्रसंगी पञकार उंडे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळाली प्रवरा केंद्र प्रमुख निलीमा गायकवाड या होत्या. तर शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्ष सुनिल शेटे, सदस्य अमोल भांगरे मुख्याध्यापक मंगल पठारे,देवळाली प्रवरा केंद्रातील विविध शाळेचे मुख्याध्यापक स्वाती जोशी,मनिषा सोनवणे,वृषाली जोशी,सुवर्णा साळुंके,शुभांगी साळवे,विलास पठारे,संदिप ससाणे,शौकत पिंजारी,इमाम सय्यद आदी उपस्थित होते.सेवानिवृत्त शिक्षक सुरेंद्रकुमार जासुद यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षासाठी खुर्ची भेट दिली.
यावेळी उंडे बोलताना म्हणाले की, आज पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वाढला आहे.परंतू वास्तविक पाहता स्पर्धा परीक्षेतून निवडी मराठी माध्यमांची मुले सर्वाधिक असतात.मराठी माध्यमांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या तर इंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यमाकडे विद्यार्थी संख्या वाढली शकते.शाळेत असलेल्या संगणक प्रयोगशाळेचा उपयोग करुन शिक्षकांनी पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविले तर आजच्या डिजीटल युगात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्या प्रगती दिसेल. विद्यार्थ्यांची प्रगती दिसली तर शाळेतील प्रवेश क्षमता वाढेल त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन उंडे यांनी केले.
यावेळी सत्कारमुर्ती सुरेंद्रकुमार जासुद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 34 वर्ष सेवा केली. या शाळेत तीन महिण्यापुर्वी बदलून आलो.येथे येण्यापुर्वी मला अनेक शिक्षकांनी येथिल व्यवस्थापन कमिटी बाबत भिती घातली होती.परंतू येथे हजर झाल्यावर समजले की, कानात आणि डोळ्यात चार बोटाचे अंतर असते.जे समजले होते. त्या पेक्षा येथे उलटे पाहण्यास मिळाले. येथिल कमेटी उलट सहकार्याच्या भुमिकेतून काम करते.शिक्षकांच्या अडीअडचणीच्या वेळी सहकार्याची भुमिका ठेवली जाते.असे जासुद यांनी सांगितले.