मराठी राष्ट्र ..

0

महाराष्ट्र उपजाऊ

सु संधी अपरंपार

संतांची स्नेह भूमि

रे कनवाळू अपार

आणा  उद्योग धंदे

सुखे करा व्यापार

सुरक्षा देती कायदे

इथले कडे  कपार

मित्र  होऊन रहावे

लोक  समजूतदार

जर कुणी डळमळे

देती सक्षम आधार

सर्वं धर्म  समभाव

सौहार्दपूर्ण आचार

दुही  माजवण्याचा

नकाकरू अविचार

शिकून पहा मराठी

जाणवे  अमृत धार

सन्मान एकदुजांचा

हाच पक्का निर्धार

शिवबा वशंजआहो

झुकणार ना लाचार

आ रे ला म्हणू कारे

विरत्व  करी  संचार

येवू द्यावे परप्रांतीय

सहज उचलतो भार

अस्मितेचा अवमान

परत पाठवू  साभार

2)

भिम कामगार ..

कामगारांच्या  मना

जागली निळीज्योत

बाबासाहेब  आपले

उपकार अनंत  होत

कामगार  कैवारी ते

बदलकेले कायद्यात

सुट्टी  रजा  मोबदला

राहीआज फायद्यात 

विमा  करी  संरक्षीत

होता  कधी अपघात

कामगारांचे  संघटण

तुम्हामुळेचं भारतात

संस्था  सेवा योजना 

आणली अस्तीत्वात

बेकारांना मिळे काम

घामांमध्ये भिजे हात

चर्चा  विमर्श  करावा

प्रश्न सोडवी शांततेत

औद्योगिक कलहाचा

कायदा येई प्रत्यक्षात

पगारीरजा महिलांना 

विश्रांती ती  प्रसुतीत

अविश्रांत  कार्य  तव

उपकार ते  अगणित 

कामगार न् शेतकरी

आहे सुखी आनंदात 

क्रांती सूर्या भिमरावा

स्वभिमाने  कुर्नीसात 

– हेमंत मुसरीफ पुणे .

  9730306996

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here