आढाव खुन खटल्यात माफीचा साक्षीदार हर्षद ढोकणेने सांगितला खुनाचा घटनाक्रम
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
काही वर्षापुर्वी अँड दिनकर ताके यांचा खुन शेतीच्या वादातुन खुन झाला होता.या खुनाच्या गुन्ह्यात अँड ताके यांच्या भावाला अटक करण्यात आली होती.परंतु आढाव खुन खटल्यात माफीचा साक्षीदार हर्षद ढोकणे खुनाचा घटनाक्रम सांगताना अँड राजाराम आढाव यांच्या डोक्यात पिशवी घालताना अँड मनिषा आढाव म्हणाल्या की,माझ्या वडीलांनाही मारले आता आम्हालाही मारा या वाक्यावर प्रकाश झोत टाकला तर.अँड ताके यांच्या खुनाचा आणि आढाव दांपत्य खुनाचा संबध आहे का ? असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.
अँड ताके यांच्या खुनामागे किरण दुशिंग टोळीचा हात आहे का?याचे उत्तर न्यायालयासमोर येईलच परंतु हर्षद ढोकणे याने माफीचा साक्षीदार होताना पोलिसांना घटनाक्रम सांगितला असताना अँड मनिषा आढाव यांनी मृत्यूपुर्वी दुशिंगच्या टोळी समोर वापरलेल्या वाक्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष का केले असावे.आढाव दांपत्य खुनाच्या तपासात अँड खुनाचा संबध येतो का? माफीचा साक्षीदार ढोकणे याने न्यायालयासमोर सांगितलेल्या माहितीमुळे अँड ताके व आढाव वकील खुनाचे रहस्य पोलिसांनी तपासात बाहेर काढले नाही.हा प्रश्न तसाच राहणार आहे का?.
राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे ॲड. राजाराम जयवंत आढाव (वय ५२) व ॲड. मनीषा आढाव (वय ४२) यादोघांचे २५ जानेवारी २०२४ रोजी अपहरण करुन त्याच राञी खुन करुन मृतदेह उंबरे येथिल स्मशानभुमितील विहिरीत दगड बांधुन टाकुन देण्यात आले.२५ जानेवारीच्या राञी गस्तीवर असलेल्या पो.काँ.प्रमोद ढाकणे व पो.काँ.नदिम शेख हे कोर्टा जवळ गस्त घालत असताना त्या गाडीचा संशय आला म्हणुन पाठलाग केला. परंतू ते हाथी लागले नाही.न्यायालयाच्या आवारात लावलेल्या गाडीचा शोध घेतला असता ॲड. राजाराम जयवंत आढाव यांची असल्याचे समजले.अँड आढाव यांच्या बाबत माहिती घेतली असता आढाव यांचा स्थांग पत्ता लागला नाही.अँड आढाव यांच्या गाडीची तपासणी संशायास्पद वस्तू आढळल्याने आढाव दांपत्याचे अपहरण झाल्याचे लक्षात आले.त्या दुष्ट्रीने तपास केला. पो.काँ.प्रमोद ढाकणे व नदिम शेख यांच्या सतर्कतेमुळे २४ तासाच्या आत खुन झाल्याचे लक्षात आले.खुन कोणी केला व कशासाठी केला.याचा तपास पोलिसांनी केला.किरण नानाभाऊ दुशिंग, सागर साहेबराव खांदे,हर्षद ढोकणे, शुभम महाडिक, बबन सुनील मोरे आदींनी खुन केल्याचे समोर आले.
सोमवार दि.९ ते १० नोव्हेबर रोजी जिल्हा सञ न्यायाधिश अंजू शेंडे यांच्या समोर सलग तीन दिवस सुणवणी सुरु होती.या सुनवणी दरम्यान अँड उज्वल निकम यांनी माफीचा साक्षीदार तपासताना हर्षद ढोकणे यांने अँड राजाराम आढाव यांच्या डोक्यात पिशवी घातल्या नंतर अँड मनिषा आढाव यांनी माझ्या वडिलांना मारले, आता आम्हालाही मारा,असे अँड मनीषा आढाव ओरडल्या.या ओरडण्याच्या विधानामागे नेमका काय हेतू होता.
अँड दिनकर ताके हे अँड मनिषा आढाव यांचे ते वडील होत.नेवासा येथिल शेतीत त्यांच्यावर गोळीबार करण्यात त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या भावा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अँड ताके यांच्या खुनाशी दुशिंग टोळीचा संबध आहे का? मरण्यापुर्वी अँड मनिषा आढाव यांच्या एका वाक्यामुळे अनेक शंका निर्माण होण्यास सुरवात झाली आहे. माफीचा साक्षीदार याने न्यायालयासमोर आणलेल्या घटनाक्रमातील वाक्याचा त्यावेळी पोलिसांनी तपास का केला नाही. असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आढाव खुन खटल्याची पुढील सुनवणी ६ जानेवारी रोजी होणार आहे.त्यावेळी सरकारी वकील उज्वल निकम अँड मनिषा आढाव यांच्या वाक्यावर प्रकाश झोत टाकतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे.