म. फुले कृषि विद्यापीठ जीवाणू खत प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभागाच्या काचगृहाशेजारी जीवाणू खत प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

         हा प्रकल्प वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख आणि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे आणि प्रकल्प प्रमुख डॉ. आण्णासाहेब नवले यांचे मार्गदशनाखाली सुरू असुन यामध्ये द्रवरुप आणि पावडर स्वरूपातील दर्जेदार जीवाणू खतांची निमिर्ती होणार आहे. या अगोदर जीवाणू खतांची निमिर्ती चालूच असुन या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना  मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना  तीनही ऋतुमध्ये जीवाणू खते मुबलक प्रमाणात मिळतील आणि त्यांना याचा आर्थिक फायदा मिळेल असे मत यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी व्यक्त केले. या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर महाविद्यालय डॉ. बापुसाहेब भाकरे, कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने, रोगशात्र विभागाचे डॉ. संजय कोळसे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here