संगमनेर : रयत शिक्षण संस्था सातारा यांचे वतीने कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत ‘रयत प्रज्ञाशोध’ परीक्षा -२०२३ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत दाढ खुर्द ता. संगमनेर येथील इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेली कु. ईश्वरी अशोक पर्वत हिने २०० पैकी ११२ गुण मिळवत सात्रळ येथील श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू कन्या विद्यालयातून द्वितीय क्रमांक मिळवला.
कु ईश्वरी हिच्या या यशाबद्दल विद्यालयाकडून व दाढ खुर्द ग्रामस्थाकडून ईश्वरीचे विशेष कौतुक होत आहे. या परीक्षेसाठी ईश्वरी हिस कन्या विद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.