राजूभाई शहा यांची जिल्ह्यातील 25 गोशाळांना 11 लाख रुपयांची देणगी

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                   अहमदनगर जिल्ह्यात सध्या तीव्र दुष्काळ असल्याने जिल्ह्यातील 25 गोशाळेत चारा टंचाई निर्माण झालेली असताना मुंबई येथील वर्धमान संस्कार धाम या संस्थेचे  राजू भाई शहा यांनी जिल्ह्यातील 25 गोशाळेतील जनावरांसाठी 11 लाख रुपयांची देणगी दिली असुन आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या सुमारे 25 गोशाळेला त्यांच्यामार्फत चारा पुरवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा गोसेवा महासंघाचे अध्यक्ष ललित चोरडिया यांनी दिली आहे.

              उन्हाची तीव्रता वाढत चालली असुन गोशाळेतील जनावरांना हिरवा चारा मिळणे अवघड झाले होते.शासना कडून गोशाळेसाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नसल्याने गोशाळा चालविणारे सर्वजण देणगीवर आधारीत असतात या महिण्यात मुंबई येथील वर्धमान संस्कार धाम या संस्थेचे  राजू भाई शहा यांना अहमदनगर जिल्ह्यातील सर्व गोशाळेंना दुष्काळा निमित्त दोन महिने चारा पुरवण्यात यावा अशी विनंती जिल्ह्यातील गोशाळा चालक यांनी केली असता गोशाळा चालकांची विनंती मान्य अकरा लाख रुपये देणगी देणगी देवून आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या सुमारे 25  गोशाळेंना त्यांच्यामार्फत चारा पुरवण्यात येत आहे.पुढील महिणा चाऱ्यासाठी खूप अडचणीचा असणार आहे.वर्धमान ट्रस्टने मदत केली म्हणून सर्व गोशाळेमध्ये चालू महिन्यात हिरवागार मका, सुपरनीतीयर कोंडी गवत! ऊस आदी प्रकारचा हिरवा चारा मिळालेला आहे. दुष्काळामुळे गोशाळेतील संख्या खूप वाढलेली आहे. देशी गाया दूध कमी देते म्हणून कोणी सांभाळायला तयार नाही. महाराष्ट्र सरकार गोशाळेना एक रुपया सुद्धा मदत करीत नाही. गोसेवा आयोग स्थापना होऊन एक वर्षे पूर्ण झालेले आहे. सरकार गोसेवा आयोगाला पूर्ण स्वातंत्र्य देत नाही. गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य अतिशय सकारात्मक काम करणारी मंडळी आहे. दुष्काळामध्ये गोमाता वाचवण्याचे काम करणाऱ्या वर्धमान संस्कार धाम या ट्रस्टचे  जिल्ह्यातील सर्व देशी गोभक्ताकडून  आभार व्यक्त करण्यात आले.

             जिल्हा गोसेवा महासंघाचे अध्यक्ष ललित चोरडिया  उपाध्यक्ष रवींद्र महाराज सुद्रिक  व सेक्रेटरी गौतम कराळे व इतर सर्व सदस्य गोशाळेतील गोधन वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here