राधाबाई काळे  महाविद्यालयात संशोधन कार्यप्रणाली विषयावर कार्यशाळा संपन्न

0

अहमदनगर –  अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष व महाविद्यालय संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालयात सोमवार, दि. १0 एप्रिल २०२३ रोजी “संशोधन कार्यप्रणाली” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बीजभाषक म्हणून डॉ. अनिल घुले, प्रोफेसर, रसायनशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, हे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे होते. डॉ. अनिल घुले यांनी आपल्या बीजभाषणात संशोधनाची सुरवात कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. संशोधन हि काळाची गरज असून नवनवीन विषयांचा शोध आपण कसा घेवू शकतो तसेच संबधित विषयावर काय संशोधन सुरु असून त्याची माहिती आपण कशी घेवू शकतो याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर थोपटे यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी रयत शिक्षण संस्था व महाविद्यालयविषयी माहिती सांगितली. तसेच संशोधन कार्यप्रणाली का गरजेची आहे? व कार्यशाळेचे आयोजन का करण्यात आले? याविषयी माहिती विशद केली. प्रमुख पाहुण्यांची ओळख भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. शंकर केकडे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. लक्ष्मी काथवटे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी ठुबे यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील संशोधन केंद्र समितीचे समन्वयक डॉ. मुबारक शेख, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष समन्वयक प्रा. रिजवान खान, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सतीश सायकर आणि शारीरिक शिक्षण संचालक विभागप्रमुख विलास एलके यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. भूपेंद्र निकाळजे, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here