आजचा दिवस
शके १९४५, शोभननाम संवत्सर, शुक्रवार, दि. १ सप्टेंबर २०२३, निज श्रावण कृष्ण द्वितीया, चंद्र – कुंभ राशीत सकाळी ९ वा. ३६ मि. पर्यंत नंतर मीन राशीत, नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा दुपारी २ वा. ५६ मि. पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा, सुर्योदय- सकाळी ६ वा. २५ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५३ मि.
नमस्कार आज चंद्र कुंभ राशीत सकाळी ९ वा. ३६ मि. पर्यंत रहात असून नंतर तो मीन राशीत रहाणार आहे. आजचा दिवस उत्तम दिवस आहे. आज चंद्र – मंगळ प्रतियोग होत आहे. आजचा दिवस सर्व राशींना संमिश्र स्वरुपाचा जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : दिवसाची सुरुवात जरी उत्साहवर्धक झाली तरी दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत.
वृषभ : कामाचा ताण कमी होईल. दुपारनंतर अनपेक्षितपणे जुने मित्रमैत्रिणी भेटतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. मनोबल उत्तम राहील.
मिथुन : व्यवसायातील अडचणी चिकाटीने सोडवणार आहात. अंगिकृत कार्यात सुयश लाभेल. मनोबल वाढेल, हितशत्रूवर मात करणार आहात. उत्साहाने कार्यरत राहणार आहात.
कर्क : कालपर्यंत जाणवत असणारी चिंता मिटेल. उत्साही रहाल. दुपारनंतर आनंदाने कार्यरत रहाल. दैनंदिन कामे यशस्वी होतील. उत्साही रहाल. काहींना प्रवास करावा लागेल.
सिंह : कामाचा ताण व दगदग राहणार आहे. दुपारनंतर एखादी मनस्ताप दायक घटना संभवते. बेकायदेशीर गोष्टी टाळाव्यात. मनोबल कमी राहील. आरोग्य जपावे.
कन्या : दिवसाची सुरुवात जरी निरुत्साही असली तरी तुमचा उत्साह दुपारनंतर वाढणार आहे. अनावश्यक कामे सम्पतील. प्रवासाचे योग येतील. मनोबल वाढणार आहे.
तुळ : दुपारनंतर काही अनावश्यक कामात वेळ जाईल. खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : बौद्धिक परिवर्तन होणार आहे. आनंदी रहाणार आहात. महत्वाचे निर्णय घ्याल. हितशत्रूवर मात करणार आहात. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो.
धनु : जिद्द वाढणार आहे. मन आनंदी व आशावादी राहील. खर्च कमी होणार आहेत. मनोबल वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. कायक्षेत्रात उत्तम प्रगती कराल.
मकर : कौटुंबिक जबाबदारी आनंदाने पार पाडणार आहात. मनोबल उत्तम राहील. दुपारनंतर नातेवाईकांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. उत्साही रहाल.
कुंभ : दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. मनोबल उत्तम राहील. काळजी व चिंता हळूहळू कमी होणार आहेत. कामाचा व्याप वाढणार आहे.
मीन : दुपारनंतर उत्साहवर्धक घटना घडेल. आनंदी व आशावादी रहाल. दैनंदिन कामे दुपारनंतर पूर्ण होतील. चिंता मिटेल. आर्थिक कामे आज नकोत.
आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ या वेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, सातारा- ९८२२३०३०५४