देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालूक्यातील डिग्रस परिसरात दहावीचे पेपर दिल्यानंतर दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञात तरूणांनी अपहरण केल्याची घटना दिनांक २५ मार्च रोजी घडली. या घटनेमुळे पालक वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान दोन्हीं मुली नगरमध्ये सापडल्या आहेत दोन दिवस गुन्हे शाखा व कोतवाली पोलीस पथकाने सयुक्तिक तपास केला, दोघीची कोतवाली पोलीस कसून चौकशी करीत आहे.
या घटनेतील एक १५ वर्षीय व एक १६ वर्षीय या दोन अल्पवयीन मुली एकाच वर्गात शिक्षण घेत होत्या. त्या दोघी शनिवार दिनांक २५ मार्च रोजी दहावीचा पेपर देण्यासाठी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमीक विद्यालय व ज्युनियर कलेज येथे गेल्या होत्या. त्या दोघी ऊशीरा पर्यंत घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे घरच्या लोकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. पेपर दिल्यानंतर दुपारी अडिच वाजेच्या सुमारास अज्ञात तरूणांनी त्या दोन्ही मुलींचे अपहरण केल्याचे समजले. सदर दोन्ही अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवुन नेले बाबत खात्री झाल्यानंतर मुलींच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला.
त्या मुलींच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून अज्ञात तरूणां विरोधात गुन्हा रजि. नं. ३२७/२०२३ भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.