राहुरी तालुक्यातील मामा व भाच्याने भाजपाला पाडले खिंडार !

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

             राहुरी तालुक्यातील मामा व भाच्याने भाजपाला खिंडार पाडले. भाजपाचे भावी उमेदवार  विधानसभेचे तिकीट मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरु असताना शरद पवार गटाच्या राष्ट्रावादी गटाने तालुक्यातील अनेक गावात सुरुंग लावून भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के देण्यास सुरवात केली आहे. तालुक्यातील अनेक युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारधारे समवेत काम करण्यास इच्छुक झाल्याने जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. 

      यापूर्वी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.राहुरी तालुक्यातील धानोरे येथील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर

प्रवेश केला. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पक्ष कार्यालयात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या सर्वांचे पक्षात स्वागत करुन त्यांना आमदार तनपुरे यांनी शुभेच्छा दिल्या. 

           राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण पक्ष विस्तारासाठी कायम कार्यरत राहतील असा विश्वास आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला. यावेळी अभिषेक दिघे,केतन दिघे,अजिंक्य दिघे, प्रशांत दिघे, किरण दिघे, प्रतीक दिघे, रवींद्र .त. दिघे,आदित्य दिघे, बाळासाहेब दिघे, रवींद्र दिघे, विजय वाबळे, सचिन दिघे, सुदेश दिघे, रमेश दिघे, रामनाथ दिघे, योगेश दिघे, प्रतीक वि दिघे, प्रवीण दिघे, अक्षय दिघे, ऋषिकेश दिघे आदींनी प्रवेश केला.

             यावेळी सागर डुक्रे, अमोल दिघे, जयराम दिघे, राजेंद्र दिघे, सतीश दिघे, सागर दिघे,गणेश दिघे, विजय दिघे, सोपान दिघे, अमोल दिघे आणि सचिन दिघे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here