राहुरी पोलिसांची टाकळीमियाँ याञेत दंबगिरी 

0

उलटा चोर कोतवाल को डाटे  ..चार जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा 

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                 राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथिल याञा उत्सवातील छबिना मिरवणूकीत पोलिसांची तरुणांवर दंबगिरी करुन सात आठ तरुणांना जबर मारहाण केली. दुसऱ्या दिवशी लावण्याच्या कार्यक्रमात धिंगाना घालणाऱ्या तरुणांना सोडुन देत शांतपणे कार्यक्रम पाहणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी दंबगिरी करत अनेक तरुणांना मारहाण केल्याने संतप्त तरुणांनी पोलिसांवर दगडफेक  केल्याने 17 ते 18 तरुणांची धरपकड करुन 4 तरुणां विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

               याबाबत समजलेली माहिती अशी की,शुक्रवारी राञी टाकळीमियाँ येथे याञे निमित्त छबिना मिरवणूक सुरु असताना काही तरुणांनी गाण्यावर ठेका धरला त्यावेळी नाचणाऱ्या तरुणांना बाजुला नेणून पोलिसांनी दंबगिरी करत तरुणांना बेदम मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले.त्याचवेळी पोलिसांविरोधात काही तरुण आक्रमक भुमिका घेत घोषणाबाजी केली.स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेवून झालेल्या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

            शनिवारी राञी लावण्याचा कार्यक्रम सुरु असताना काही तरुण लावणीच्या ठेक्यावर नाचण्याचा प्रयत्न करीत असताना गोंधळ घालण्यास सुरवात झाली.परंतू गोंधळ घालणारे तरुण पोलिसांच्या हातातून निसटले.जे तरुण शांतपणे कार्यक्रम पाहत बसले होते त्याच तरुणांविरोधात पोलिसांनी दंबगिरी करीत मारहाण करण्यास सुरवात केली.संतप्त तरुणांनी मारहाण करीत असल्याने दगडफेक करण्यास सुरवात केली.या दगडफेकीत एक पोलिस जखमी झाला आहे.पोलिसांनी दंबगिरी करीत दिसेल त्याला बळजबरीने धरुन पोलिस गाडीत बसविले जात होते.17 ते 18 तरुणांना पकडून राहुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.यापैकी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.यात माञ दगडफेक करणारे तरुण पळून गेले.चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रयत्न येथिल पोलिसांनी केला आहे.

              राहुरी पोलिसांनी पो.काँ. शिवहरी रंगनाथ दळवी यांच्या फिर्यांदी वरुन  शरद बबन करपे, योगेश करपे,पप्पू करपे, आकाश दिलीप दरंदले आदीं विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.

.…..मला माहिती सांगण्यास वेळ नाही.

याबात देवळाली प्रवरा पोलिस चौकीचे प्रमुख साहय्यक फौजदार विष्णू आहेर यांना भ्रमणभाषवरुन टाकळीमियाँतील घटनेची माहिती विचारली असता.त्यांनी टाकळीमियाँतील याञेत सरकारी कामात अडथळा आणल्याचा मध्यराञी नंतर गुन्हा दाखल झाला आहे.परंतू मी आज रजेवर आहे.मला माहिती सांगण्यास वेळ नाही.असे साहय्यक फौजदार विष्णू आहेर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

पोलिसांनी दबंगगिरी केली नसती तर याञेला गालबोट लागले नसते.छबिना मिरवणूकीत पोलिसांनी काही तरुणांना मारहाण केली.त्यावेळी स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करुन प्रकरणावर पडदा टाकला. लावण्याच्या कार्यक्रमात ज्यांनी धिंगाना घातला त्यांना सोडून देण्यात आले.जे शांत कार्यक्रम पाहत होते त्यांच्यावर पोलिसांनी दबंगिरी करुन मारहाण करीत पोलिस गाडीत बसविले निपराध तरुणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.बबनदादा करपे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here