देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील जातप शिवारातील जापत गडाख वस्ती शिवरस्त्यावर गेल्या 20 ते 25 वर्षा पासुन मागणी करुन हि लोकप्रतिनिधी मरुम टाकण्यात अपयश आल्याने या रस्त्याचा कायम वापर करणाऱ्या पंधराशे कुटुंबाने लोकवर्गणी करून सुमारे 4 कि.मी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.रस्ता दुरुस्ती नंतर लोकप्रतिनिधींना जाग आली तर मुरुम टाकुन द्यावा. अन्यथा यापुढील निवडणूकीत लोकप्रतिनिधीना मतदानरुपी धडा शिकविण्यात येईल असा इशारा येथिल ग्रामस्थांनी दिला आहे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा जातप शिवहद्दीतील जातप ग्रामपंचायत हद्दीत येणारा जातप शिवरस्ता क्र 38 गेल्या 20 ते 25 वर्षा पासुन लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे यारस्त्याची अवस्था पाहता सायकल नीट चालवता येत नाही.तेथे मोटारसायकल व चारचाकी वाहन कसे चालवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.येथिल ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी सह ग्रामपंचायतीस निवेदने देवून रस्ता दुरुस्तीची मागणी केली.परंतू ग्रामस्थांच्या पदरी निराशा आली.दर पावसाळ्यात शेतकऱ्यांना डोक्यावर दुधाच्या किटल्या घेवून सायकल उचलून घेणे. या भागातुन सुमारे 100 ते 150 विद्यार्थी दररोज शाळेत जाता येतात पावसाळ्यात या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.
गडाख वस्ती भागात राहणारे पंधराशे कुटुंबे एकञ आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.याबैठकीत ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे.ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासनाशिवाय आज पर्यंत काहीच मिळाले नाही.त्यामुळे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर आता विश्वास राहिला नाही.त्यामुळे आपला रस्ता आपल्यालाच करावा लागणार आहे. पंधराशे ग्रामस्थांनी एकञ येत लोकवर्गणी गोळा निर्णय घेतला. लोकवर्गणीतून आहे तो रस्ता उकरुन सपाटीकरण करुन त्यावर रोलर फिरवूण खडी दाबण्याचे नियोजन करण्यात आले.
गडाख वस्ती येथिल ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करण्यास सुरवात केली. पंधराशे कुटुंबाने लोकवर्गणी दिली.त्यातुन 60 ते 70 हजार रुपये जमा झाले होते.जमा झालेले पैशातुन जेसीबी व इतर साहित्यासाठी खर्च करण्याचे ठरवले. पाण्याचा टँकर व रोलरचा पुर्ण खर्च शिंदे गटाचे अध्यात्मिक जिल्हाप्रमुख संपत जाधव यांनी उचलला लगेच कामाला सुरवात करण्यात आली. लोकवर्गणी बरोबर ग्रामस्थांनीही श्रमदान करण्यास सुरवात केली.
याबैठीत व श्रमदानात डॉक्टर सागर गडाख, भारत गडाख, अन्वर शेख, नंदू शिंदे, भगवान शिंदे, बाळासाहेब खांदे, अण्णासाहेब पठारे, दत्तात्रय खांदे, प्रवीण जाधव, निलेश जाधव, राजेंद्र मुसमाडे, भारत मुसमाडे, शरद मुसमाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकसहभागातुन झालेल्या रस्त्यावर लोकप्रतिनिधींनी मुरुम टाकावाःजाधव
जापत देवळाली प्रवरा शिव रस्त्याचे काम येथिल ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून केले आहे. या कामासाठी पाण्याचे टँकर व रोलर याचा होणारा खर्च मी स्वतः देणार आहे.लोकप्रतिनिधींना जाग आली असेल तर लोकवर्गणीतुन केलेल्या रस्त्यावर मुरुम तरी टाकुन द्यावा. लोकप्रतिनिधीकडे हा मजबुतीकरण व डांबरीकरण करुन द्यावे अशी अपेक्षा सुद्धा ग्रमस्थांची नाही.
संपत जाधव जिल्हाध्यक्ष अध्यात्मिक आघाडी
लोकप्रतिनिधींचा निवडणूकीत विचार करावा लागेलः गडाख जातप शिव रस्त्याकडे गेल्या विस पंचविस वर्षा पासुन लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केले आहे.आम्ही लोकवर्गणीतून रस्ता दुरुस्त केला आहे.लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर यापुढील निवडणूकीत लोकप्रतिनिधींकडे आम्हालाही दुर्लक्ष करावे लागेल.
भारत गडाख शेतकरी ग्रामस्थ