लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर

0

विधेयकाच्या बाजूने ४५४ तर विरोधात केवळ दोन मतं

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने ४५४ तर विरोधात केवळ दोन मतं लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूने ४५४ मतं पडली असून केवळ दोन खासदारांनी विरोधात मतदान केलं आहे. काँग्रेस आणि इतरही विरोधातील पक्षाने विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने हे विधेयक राज्यसभेतही मंजूर होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

संसदेच्या नवीन इमारतीमध्ये मंगळवारपासून (१९ सप्टेंबर) कामकाज सुरू झालं. पहिल्याच दिवशी कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक मांडलं.
या विधेयकामध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी महिलांना ३३या घटनादुरुस्तीनुसार लोकसभा, विधानसभा आणि दिल्ली विधानसभेतील एक तृतीयांश जागा या महिलांसाठी आरक्षित होतील. याचाच अर्थ लोकसभेच्या ५४३ जागांपैकी १८१ जागा महिलांसाठी राखीव असतील.

लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींसाठी (एसटी) जागा राखीव आहेत. या राखीव जागांमध्ये आता एक तृतीयांश जागा या महिलांसाठी राखीव होतील.

सध्याच्या घडीला लोकसभेच्या १३१ जागांपैकी एससी-एसटींसाठी आरक्षित आहेत. महिला आरक्षण विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर यांपैकी ४३ जागा या महिलांसाठी आरक्षित राहतील. या ४३ जागांना सभागृहातील महिलांसाठी आरक्षित एकूण जागांचा एक भाग म्हणून पाहिलं जाईल.

याचाच अर्थ महिलांसाठी आरक्षित १८१ जागांपैकी १३८ जागा अशा असतील, ज्यांवर कोणत्याही जातीच्या महिलेला उमेदवारी देता येऊ शकेल. म्हणजेच या जागांवर पुरूष उमेदवार नसतील. आरक्षण देण्याची तरतूद आहे. महिला आरक्षणासाठी सादर करण्यात आलेलं हे विधेयक १२८ वी घटनादुरुस्ती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here