जामखेड तालुका प्रतिनिधी – १ मे २०२४ राष्ट्रीय कामगार दिनानिमित्त तसेच महाराष्ट्र दिन निमित्त जामखेड उपविभागाच्या वतीने मार्च २०२३-२०२४ चे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जामखेड उपविभागीय कार्यालय तर्फे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्जत चे कार्यकारी अभियंता विजय माळी, सहाय्यक अभियंता येवला, प्रभारी उपकार्यकारी अभियंता अमोल राजोळे, अरणगावचे सहाय्यक अभियंता गणेश चौधरी, नान्नज चे सहाय्यक अभियंता पवार, खर्डा चे सहाय्यक अभियंता सौ. प्रितम चव्हाण यांच्या उपस्थितीत .एस.एस.वाघ ,.सचिन चोरगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या प्रसंगी महावितरण कंपनीत अहोरात्र मेहनत करून मयत झालेल्या कर्मचारी बारामती परिमंडळातील मोरगाव येथे कार्यरत असलेल्या कै.रिंकू बनसोडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला झालेल्या महिला कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तसेच जामखेड उपविभागातील अरणगाव कक्षातील किसन गोडसे यांना गुणवंत कामगार पुरस्कृत यांना गुणगौरव करण्यात आला.तसेच या कार्यक्रम प्रसंगी निलेश शिंदे, किसन गोडसे,.गौरव कुलकर्णी,.अमोल राजोळे, गणेश चौधरी, पवार व सौ चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय माळी यांनी कर्मचाऱ्यांच्ये सन्मानपत्र गुलाब पुष्प व शाल देऊन सन्मान करण्यात आला तसेच येणारा काळात महावितरण कंपनीचे कवच म्हणून आपण सर्व सोबत कसे कामकाज करावे तसेच वीज गळती कमी करणे जास्तीत जास्त ग्राहकांना सेवा देण्यासाठी आपण बांधील आहोत ग्राहकांना जास्ती जास्त सेवा देऊ या करीता व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी मनोगत व्यक्त केले व पुढील काळात महावितरण कंपनी करीता व सर्व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सुरक्षितेची प्रार्थना सचिन जाधव यांनी वाचून घेतली तर कार्यक्रमाचे आभार गणेश केदार यांनी केली तर या प्रसंगी भरत नाईकनवरे, नंदकुमार मेहत्रे, अजिनाथ वाघमारे, गायकवाड या प्रसंगी उपस्थित होते.