चांगल्या प्रतीच्या ऊसाला मागणी वाढली
पोहेगांव (वार्ताहर) : सध्या कोपरगाव तालुक्यासह इतर परिसरात प्रचंड उन्हाचा तडाखा वाढला आहे जवळपास 41 डिग्री तापमान असलेले प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व वाढत्या उष्णतेला रसवंतीचा Rasvanti’ रस पिऊन शमविण्याचा काहीसा प्रयत्न नागरिकांकडून होत आहे. वाढत्या उष्णतेला रसवंतीचा आधार असल्याने रसवंती चालकांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे तर शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीच्या उसालाही चांगला भाव मिळत आहे.
लग्न सराईची प्रचंड धावपळ असताना नको म्हणता देखील लग्नकार्याला जाण्यासाठी घरातून बाहेर पडावी लागते. सर्वसामान्य नागरिकांना मात्र आपल्या मोटरसायकलच्या प्रवासाने इतर कार्यक्रमासाठी जावे लागते. त्यामुळे अंगाची प्रचंड नाही होते. अनेक देशी-विदेशी शीतपेय पिण्यापेक्षा उसाच्या रसवंतीला उन्हाळ्यात जास्त पसंती दिली जाते. येवला मनमाड भरवसफाटा पोहेगाव कोकमठाण आदी परिसरात 86 0 32 प्रजातीचा ऊस अजून उपलब्ध असल्याने त्या उसापासून मिळणारा रस आरोग्यासाठी लाभदायक असल्याने ऊस पिणाऱ्यालाही थंडक मिळते व रसवंती चालक व शेतकऱ्याला ही समाधान मिळत आहे.
प्रचंड उष्णता असल्याने बाहेर पडणे कठीण परंतु पै पाहुण्यांचे लग्न कार्यक्रम असल्याने बाहेर पडावे लागते. या संपूर्ण उन्हाळ्यात शरीरासाठी उसाचा रस लाभदायक ठरत आहे. साधारण दहा ते पंधरा रुपये खर्च करून हा रस मिळत असल्याने सर्वसामान्यांना परवडणारा आहे.
जालिंदर चव्हाण :पोलीस पाटील धनकवाडी
फ्रिजमधील कोल्ड्रिंक्स व इतर शीतपेय हे काही अंशी शरीराला अपायकारक असतात. हे शीतपेय किती प्यावे याची मर्यादा देखील ठरलेली आहे. एखादा व्यक्ती साधारण दोन ते पाच बॉटल शेतपेय पिला तर त्याला गुंगी आल्यासारखे होते. त्यामुळे उन्हाळ्यात उसाच्या रसाचाच आधार घेतला पाहिजे.. केशव जाधव ग्राहक
उसाची रसवंती यावर्षी जानेवारी महिन्याचा सुरू झाली असून प्रचंड उष्णता असल्याने चालू वर्षी उसाच्या रसाला चांगली मागणी आहे. साधारण 15 रुपये एका 250 मिली लिटरच्या ग्लासला आकारले जातात. चांगल्या प्रतीचा ऊस खरेदी करण्यासाठी साडेतीन ते चार हजार रुपये लागतात..
दीपक साळुंखे ..रसवंती चालक