विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी

0

अहिल्यानगर दि.१६- भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये  निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश देण्यात आले आहेत..

विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत. वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे  आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश  २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नामनिर्देश पत्र दाखल करतांना वाहनांच्या ताफ्यात  तीनपेक्षा अधिक वाहने आणण्यास बंदी

 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये  निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतांना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त वाहने आणण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.

मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईल वापरास बंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये  निवडणूक कालावधीत मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here