२१ फेब्रुवारी पासुन धरणे आंदोलन
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
डॉ. बाबुराब बापुजी तनपुरे साखर कारखाना संचलित विवेकानंद नर्सिंग होमच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पदोन्नती, महागाई भत्ता व पगार वाढिसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विवेकानंद नर्सिंग होमचे प्राधिकृत अधिकारी यांना निवेदन दिले आहे. आयुर्वेद महाविदयालयात कायमस्वरुपी २० ते ३० वर्षापासून काम करीत आहेत. संस्थेने दिलेल्या नेमणूक पत्रानुसार महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम व वेळोवेळी होणाऱ्या शासनाच्या बदलाप्रमाणे मिळणारे लाभ महागाई भत्ता, पदोन्नती, घरभाडे हे शासनाच्या नियमाप्रमाणे मिळतील असे शासनाच्या नेमणूक पत्रात नमूद केलेले आहे. परंतु अद्यापर्यंत कुठलाही लाभ लागू केलेला नाही.
आमची सेवा ही नियमित सलग व स्वच्छ आहे. मात्र हा लाभ संस्थेतील काही मर्जीतील कर्मचा-यांना वेळोवेळी देण्यात आलेला आहे. त्यामुळेअर्वरीत कर्मचाऱ्यांवर खूप मोठा अन्याय होत आहे. कर्मचाऱ्यां बाबत भेदभाव केला जात आहे. कर्मचाऱ्यांनी यापुर्वी वारंवार आपल्याला लेखी व तोंडी मागणी करुन मागण्या बाबत कुठलाही विचार झालेला नाही. माहे ऑगष्ट व सप्टेंबर २०२३ महिण्याचा २१ दिवसांचा पगार अनाधिकृतपणे पेंडींग ठेवलेला आहे. सध्याच्या वाढत्या महागाईमुळे शिक्षकेत्तर
कर्मचाऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. एवढ्या कमी पगारावर कुंटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे होवून बसले आहे. याप्रश्नी न्याय न मिळाल्यास नाईलाजास्तव संस्थेच्या प्रांगणात २१ फेब्रुवारी २०२५ पासून धरणे आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनात राजेंद्र लांबे, प्रमोद साळुंखे, सुदाम भागवत ,गजानन वराळे, गोविंद पठारे, अशोक उगले,भगवान म्हसे, राजेंद्र साळुंखे,योगेश जाधव,विजय डुकरे, छाया भिंगारे ,सोनाली म्हस्के, नवनाथ तारडे, ज्ञानेश्वर टिक्कल,विमल हुडे, दत्तात्रय मोरे यांच्यासह आयुर्वेद महाविद्यालय कॉलेज, बी फार्मसी व नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संस्थेत प्रशासकीय अधिकारी यांनी मर्जीतील कर्मचाऱ्याला बेकायदेशीरपणे पगार वाढ व पदोन्नती देण्याचातृ अधिकार नसता ठरावीक कर्मचाऱ्यांना पगार वाढ व पदोन्नती देण्यात आली आहे. दिलेली पगार वाढ व पदोन्नती बेकायदेशीर आसल्याची तक्रार कामगारांनी केली आहे.