कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय युवा नेते, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांचा वाढदिवस गुरुवारी (२७ एप्रिल) मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. विवेकभैय्यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोगनिदान शिबीर, कर्करोग, मूत्ररोग व अस्थिरोग तपासणी शिबीर यासारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवेकभैय्या कोल्हे यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोपरगाव शहर व तालुक्यातील भाजप, शिवसेना, रिपाइं (आठवले गट) तसेच इतर राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, संजीवनी उद्योग समुहाशी संलग्न संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत, बँक, पतसंस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था अशा विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, सरपंच, नगरसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, युवक कार्यकर्ते आदींनी विवेकभैय्या कोल्हे यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या. विवेकभैय्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची व चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा समावेश होता. विशेषत: तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांची विवेकभैय्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करून विनम्रपणे शुभेच्छांचा स्वीकार केला. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेतला.
विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यानुसार यावर्षीही विवेक कोल्हे यांच्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन ही परंपरा जपली. विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुवारी कोपरगाव शहरातील हनुमाननगर भागातील हनुमान मंदिर येथे श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत सर्व रोगनिदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन करताना विवेक कोल्हे यांनी, वाढदिवसाच्या निमित्ताने अशा प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले. प्रारंभी त्यांनी श्री हनुमानाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील शिवाजीराव निखाडे व माजी नगरसेविका सौ. हर्षाताई दिनेश कांबळे यांनी आयोजित केलेल्या या शिबिरात श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, दिलीपराव दारुणकर, राजेंद्र सोनवणे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, विजयराव आढाव, नगर परिषदेतील माजी गटनेते रवींद्रअण्णा पाठक, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, बाळासाहेब आढाव, दिनेश कांबळे, वैभव गिरमे, वैभव आढाव आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील अंबिकानगर भागातील साई धाम मंदिरात विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपनगराध्यक्ष विजयराव गोविंदराव वाजे व माजी नगरसेविका सौ. सुवर्णाताई विवेक सोनवणे यांनी मोफत कर्करोग, मूत्ररोग व अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. विवेक कोल्हे यांनी या शिबिराचे उद्घाटन करून संयोजकांना धन्यवाद दिले. या शिबिराचा अनेक गरजू नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी त्यांनी श्री साईबाबांची आरती करून मनोभावे दर्शन घेतले. प्रारंभी ज्येष्ठ माता-भगिनींनी विवेकभैय्यांचे औंक्षण केले. यावेळी विवेकभैय्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष विजयराव वाजे, विवेक सोनवणे, माजी नगरसेविका सौ. सुवर्णाताई सोनवणे, सौ. वैशालीताई वाजे, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, रवीशेठ वाजे, संदीप चोळके, योगेश शिरसे, विकी सरोदे, योगेश सुरासे, राहुल कांबळे, अनिल गोडसे, महेश पवार, राजू यादव, नितीन गिरमे, सागर जंजीरे, आकाश शिरसे, आकाश पवार, मुक्तार पठाण, गौतम गायकवाड, सागर दळवी, एकनाथ झांबरे, रोहित होन, रोहित कडू, गणेश चव्हाण, निलेश गिरमे, किरण जाधव, शेरूभाई, सादिक सय्यद, श्रीराम होन, संतोष माकोणे, नितीन सोळसे, श्रीराम लभडे, तुषार जेजूरकर, भूषण जेजूरकर, मच्छिंद्र झांबरे, शरद दाभाडे, स्वप्नील दाभाडे, वैभव पगारे,विनोद गलांडे, सतीश गाडे, शुभम भागवत, शुभम वाजे, आकाश पवार,रोहित होन, अविनाश चव्हाण, ओम सोनवणे, रोहन होन, नितीन सोळसे आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर्स व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकट……….
जनसेवेसाठी माझे संपूर्ण जीवन समर्पित -विवेक कोल्हे
माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करून आशीर्वाद दिले. या प्रेमळ शुभेच्छा माझ्यासाठी अनमोल आहेत. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आदर्श विचारांचा वारसा नेटाने पुढे चालवून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेचे हे व्रत अखंडपणे सुरू ठेवेन. तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रामाणिकपणे कार्यरत राहू, अशी ग्वाही विवेकभैय्या कोल्हे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने दिली.