कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय युवा नेते, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांचा वाढदिवस २७ एप्रिल २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विवेकभैय्यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहर व तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर व होर्डिंग ठिकठिकाणी लावण्यात आले होते. यामध्ये सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याजवळ लावलेला ४० फूट उंचीचा आगळावेगळा शुभेच्छा फलक लक्षवेधी ठरला.
विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, धार्मिक, कृषी, उद्योग, बँकिंग, वैद्यकीय, कला, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या. विवेकभैय्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी त्यांचे अभीष्टचिंतन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात मोफत सर्व रोगनिदान शिबीर, कर्करोग, मूत्ररोग व अस्थिरोग तपासणी शिबीर यासारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. तालुक्यातही विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम घेण्यात आले. विवेकभैय्या कोल्हे यांना शुवाढदिवसाच्या भेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचा समावेश होता. वाढदिवशी गुरुवारी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांची विवेकभैय्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करून विनम्रपणे शुभेच्छांचा स्वीकार केला. तसेच त्यांनी विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन संत, महात्म्यांचे आशीर्वाद घेतले.
विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी भलेमोठे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. ज्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याजवळ लावण्यात आलेला ४० फूट उंचीचा शुभेच्छा फलक नागरिकांचे खास आकर्षण ठरला. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने हा शुभेच्छा फलक लावण्यात आला. शिंगणापूरचे माजी सरपंच भीमराव संवत्सरकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक वराट, गणेश राऊत, भाजप बुथप्रमुख मंगेश गायकवाड, भाजप कार्यकर्ते सतीश निकम, मनीष निकम, मनोज इंगळे यांनी विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त हा ४० फूट उंचीचा शुभेच्छा फलक सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याजवळ लावला आहे. हा शुभेच्छा फलक सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.