वे टु भूर्र टेटस ठेवले चोरट्यांनी साधला डाव

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                 देवळाली प्रवरा येथिल पठारे वस्तीवर राहणाऱ्या एका कुटुंबाने फिरायला जाताना मोबाईलवर “वे टु भुर्र” असे टेटस ठेवून निघुन गेले.याच संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी भुर्रकन घराचे दरवाजे तोडून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकुण 3 लाख 15 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा श्रीरामपूर रस्त्यालगत पठारे वस्ती येथिल मकरंद बाबासाहेब पठारे यांच्या वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश केला घरातील दोन ते तीन कपाटाचे दरवाजे तोडून कपाटीतील पाच तोळे सोन्याचे मौल्यवान दागिणे व  रोख 15 हजार रुपये असे 3 लाख 15 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला.यात चोरट्यांनी मकरंद पठारे  याच्या आईचा मोबाईल व एक लँपटाँप चोरुन नेला आहे .या कुटुंबाने काही दिवसापूर्वीच जमिन विकली होती.त्या बदल्यात मोठी रक्कम मिळाली होती.गावाला जाण्यापूर्वी मकरंद याच्या दोन बहिणांना काही रक्कम देवूनृ उर्वरीत रक्कम बँकेत ठेवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

                     मकरंद पठारे यांच्यासह आई व दोन बहिणी बाहेरगावी फिरण्यासाठी गेल्या होत्या.बाहेरगावी जाताना मकरंद व त्याच्या दोन बहिणींनी मोबाईला “वे टु भुर्र” असे टेटस ठेवले होते. हे कुटुंब गावाला गेल्याच्या दिवसा पासुन घरी आल्याच्या राञी पर्यंत अज्ञात चोरट्यांनी घराचे कडीकोयंडे तोडून घर साफ करुन नेले. सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिणे, 15 हजार रुपये रोख 45 हजार रुपयांच्या इलेक्ट्रिक वस्तू  आशा एकूणा तीन लाख दहा हजार रुपये कीमंतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे.”वे टु भुर्र”च्या टेटसने चांगलीच धांदल उडवली आहे. याकुटुंबाचे टेटस पाहुनच चोरट्यांनी येथे हाथ मारला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास देवळाली प्रवराचे पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here