शेतकऱ्याच्या मागे बिबट्या लागला. दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला..

0

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे  

                    राहुरी तालुक्यातील  पिंपळगाव फुणगी येथिल राऊत वस्तीवर ऊसाची खांदणी करीत असताना धुळा वडीतके या शेतकऱ्याच्या मागे बिबट्या लागला होता. दैव बलत्वर म्हणून वाचला या घटनेमुळे परीसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन व्यवस्थेच्या द्रुष्टीने शेतकरी माणसे नाहीत.तर क्षुद्र जिवजंतू असल्याचे दर्शविले जात आहे.बिबट्या दिवसाढवळ्या शेतकऱ्यांवर व त्यांच्या लहान मुलांवर जीवघेणा हल्ला करत आहे.परंतू वन विभागाची माञ उदानसिता दिसुन येत आहे.

                   राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथिल राऊत वस्ती येथे धुळा वडीतके हा शेतकरी ऊसात बैलांच्या साहय्याने खांदणी काम करत असताना ऊसात लपलेल्या बिबट्याने वडीतके याच्याकडे हल्ला करण्याच्या उद्देशाने धाव घेतली.वडीतके जिवाच्या आकांताने आरडाओरड करीत शेजारील शेतात काम करत असलेल्या कामगारांकडे पळाले येथिल  ३ ते ४ कामगारांनी हातात काढ्या घेवून वडीतकेच्या मदतीला धावले. हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या बिबट्याला पळून लावले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे शेती करणेच अवघड झाले आहे.शेतमजुर शेतात काम करण्यास धजवत नाही.रस्त्याने जाता येताना बिबट्या हल्ला करण्याची भिती निर्माण झाली आहे.ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे पिंजरा लावण्याची मागणी यापूर्वी अनेक वेळा केली आहे.

            वन विभागाच्या उदासिन कारभारामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जिव महत्वाचा आहे की नाही.या विषयी वन विभागाला काही देणे घेणे नसल्याने पिंजरा लावण्याची कार्यवाहीची अपेक्षा निश्चितच अवास्तव आहे असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. शहरात वातानुकुलीत कार्यालयात बसुन वन्यप्राणी संरक्षणाचे कायदे करणारे महान पर्यावरणवादी यांनी शेतमजुर व शेतकऱ्यांचा कधी विचार केलाय का? हातावर पोट असणारे गोरगरीबांचे जिवन आणि  वातानुकुलीत बसुन कायदे बनविणाऱ्या मध्ये जिव संरक्षणावर चर्चा सुद्धा होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी जिव संरक्षण कायदा होणे गरजेचे आहे.अशी मागणी येथिल रहिवाशी प्रा.सतिष राऊत यांनी केली आहे.

                 आरण्यात राहणारा बिबट्या सध्या शेतातील पिंकामध्ये राहत असुन वन प्राणी खाणारा बिबट्या आता गोरगरीब माणसांची लचके तोडून नरडीचा घोट घेत आहे.बिबट्यांचे खाद्य आता मनुष्य प्राणी झाला असल्याचे वास्तवता सर्वांनी  स्विकारायला हवे? बिबट्यांपासून गोरगरीब जनतेचे संरक्षण करणे साठी कायदा हवा आहे.वन विभागाने  पिपाण्या वाजवण्याचे सल्ले देउन प्रश्न सुटनार नाही.तर जेर बंद केलेल्या  बिबट्यांचे निर्बिजीकरण करणे अत्यावश्यक आहे.

चौकट

  ■ शासन व्यवस्थेच्या द्रुष्टीने माणसे क्षुद्र जिवजंतू

              शासन व्यवस्थेच्या द्रुष्टीने शेतकरी माणसे नाहीत.तर क्षुद्र जिवजंतू असल्याचे दर्शविले जात आहे.बिबट्या दिवसाढवळ्या शेतकऱ्यांवर व त्यांच्या लहान मुलांवर जीवघेणा हल्ला करत आहे.परंतू वन विभागाची माञ उदानसिता दिसुन येत आहे.फुकटचे सल्ले देण्यापेक्षा पकडलेल्या बिबट्यांचे निर्बिजीकरण करणे जेणे करुन बिबट्यांच्या संख्येवर मर्यादा येईल. शेतकऱ्यांना व शेतमजुरांना शेतात काम करुन माणूस म्हणून जगता येईल.

 ■ अपुरे पिंजरे……

                   वन विभागाकडे बिबट्या पकडण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे पिंजरा लावण्याची मागणी केली तर वन विभागाकडे रेकाँडींग केल्या प्रमाणे एक उत्तर मिळते अपुरे पिंजरे असल्याने सर्वच ठिकाणी पिंजरे देवूच शकत नाही.शेतकरी व शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केल्या नंतरच पिंजरा लावणार असेल तर गरीब शेतमजुर व शेतकऱ्यांचा जिव धोक्यात घालण्याचा अधिकार शासन प्रतिनिधींना आहे का? सलमानखान याच्या घरावर  लांबून गोळी झाडली तर मुख्यमंञी भेटायला जातात. शेतकऱ्यांची मुलबाळे बिबट्या डोळ्यादेखत  उचलून नेत आहे.नरडी घोट घेत असतानाही पिंजरे कमी आहेत अशी कारणे देवून पिपाण्या वाजवून स्वतःचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला जात आहे. शासकिय सल्ल्याची उबग आली असल्याची प्रतिक्रिया प्रा.सतिष राऊत यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here