श्रीमती ताराबाई जवक वृद्धपकाळाने निधन

0

नगर – नगर तालुक्यातील कामरगांव येथील रहिवासी श्रीमती ताराबाई जयवंतराव जवक यांचे नुकतेच वृद्धपकाळाने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्या 98 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गावातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     स्व.ताराबाई जवक यांच्या पश्चात एक मुलगा, सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्या धार्मिक व मनमिळावू होत्या. त्यांच्या निधनाने पंचक्रोशितून हळहळ व्यक्त होत आहे. समाज कल्याण विभागातील सेवानिवृत्त  मधुकर जवक यांच्या त्या आई तर पुणे जिल्हा माहिती कार्यालयात कार्यरत असलेले विशाल कार्लेकर यांच्या त्या आजी होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here