कोपरगाव ; श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. योग मार्गदर्शक अनिल अमृतकर यांनी योग साधनाविषयी माहिती सांगत योगासनाचे प्राथमिक प्रकार सादर केले. योग प्रात्यक्षिके आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक प्रज्वल आदिनाथ ढाकणे व वैष्णवी आदिनाथ ढाकणे यांनी सादर केले.त्यामध्ये शिर्षासन, वृक्षासन मयुरासन, व्याघ्रासन, हनुमानासन, पूर्णचक्रासन या सारखी योगासने प्रात्यक्षिक करुन दाखवत त्याचे शारीरिक फायदे विदयार्थींना सांगितले .
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांचे मार्गदर्शनाखाली योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरेश गोरे सर यांनी योग दिन कार्यक्रमाचे संयोजन केले. या प्रसंगी विदयालयांतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विदयार्थी यावेळी योग प्रात्यक्षिके मध्ये सहभागी झाले होते.शेवटी उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी आभार मानले.