कोपरगाव : शहरातील नामांकित श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी अनिल अमृतकर सर यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयामध्ये कार्यरत असलेले प्रदीर्घ ३२ वर्षांच्या सेवेनंतर त्यांची निवड करण्यात आली.
कोपरगाव तालुक्यात जेष्ठ कलाशिक्षक म्हणून नावलौकिक असलेले अनिल अमृतकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला. कोपरगांव एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दीलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, सदस्य संदीप अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे,दीलीप तुपसैंदर,विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड, उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे,सर्व शिक्षक या प्रसंगी उपस्थित होते.
विदयालयाला खुप महान परंपरा आहे.नावलौकिक आहे तो जोपासण्याचा मी प्रयत्न करील अशी ग्वाही या वेळी नूतन पर्यवेक्षक अनिल अमृतकर यांनी दिली. गोदावरी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश आबा परजणे,गटशिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य पदमाकांत कुदळे,अरुण चंद्रे, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक चंदुलाल बजाज, जगन्नाथ चौधरी,गजानन शेटे,रमेश गवळी, मकरंद कोऱ्हाळकर,जेष्ठ नागरीक मंचचे विजय बंब,न.पा. शिक्षण मंडळाचे साईश शिंदे,अमित पराई,विषय तज्ञ विजय सोंनजे आदीनी अभिनंदन केले आहे.