संगमनेर : येथील राजस्थान युवक मंडळाने महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, माहेश्वरी समाज आणि मालपाणी परिवाराच्या सहयोगाने नूतन वर्षातील ८ जानेवारी रोजी मालपाणी हेल्थ क्लब येथे अखिल भारतीय विवाह योग्य माहेश्वरी युवक-युवतींसाठी परिचय संमेलनाचे आयोजन केले आहे. १० वर्षांपासून आयोजित होणार्या या संमेलनातून मुला-मुलींना मनासारखे स्थळ मिळाले आहेत. होणार्या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी केले आहे.
संमेलनात एकाचवेळी देशभरातील विविध ठिकाणची स्थळे प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळणार आहे. नियोजन, प्रतिसाद व भव्यता यामुळे संमेलनांच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत राहिला आहे. देशाच्या कानाकोपर्यातून समाजातील युवक-युवती पालकांसह उपस्थित राहतात, हे संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. इच्छुकांनी २५ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोंदणी फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संमेलनात नावेनोंदणी झालेल्या युवक-युवतींची परिपूर्ण माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी होणार आहे. या माध्यमातून पाल्यासाठी योग्य जोडीदाराची निवड करता येणार आहे. संमेलनस्थळी अनेक प्रकारच्या सुविधांसह पत्रिका जुळविण्यासाठी संगणक व पंडित यांची सोय करण्यात येणार आहे.समाज परिवर्तनाच्या चळवळीत महत्वाची भूमिका बजावणार्या या उपक्रमात माहेश्वरी समाजातील युवक-युवतींनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन माजी कार्याध्यक्ष कैलास राठी, राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित मणियार, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, सचिव आशिष राठी, खजिनदार उमेश कासट, सहसचिव ओम इंदाणी, सहखजिनदार व्यंकटेश लाहोटी व सदस्यांनी केले आहे.