संच मान्यतेसाठी आधारची सक्ती करू नये – सुनील गाडगे

0

शिक्षक भारतीचे मुख्यमंत्र्याना निवेदन.

नगर- संच मान्यतेसाठी आधारची सक्ती करण्यात येवू नये या मागणीचे निवेदन शिक्षक भारती संघटनेच्या वतीने  मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांना देण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.

      स्टुडन्ट पोर्टल नुसार संच मान्यता करण्याचे कार्यवाही सद्यस्थितीत कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागत आहे. पोर्टलची वेबसाईट वारंवार बंद पडत असल्याने माहिती भरणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांची वारंवार माहिती अपडेट करूनही एकूण संख्येत तफावत दिसून येते. विद्यार्थी अपडेट करण्यासाठी स्टुडंट्स पोर्टल अतिशय धिम्या गतीने सुरु असल्याने जास्त वेळ लागत आहे. इयत्ता दहावी, बारावीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षा देऊन घरी गेल्यामुळे ते लवकर संपर्कात येत नाही, त्यामुळे अपडेट करायला प्रतिसाद देत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

   शाळेच्या पटावर नोंद असलेले परंतु सरल प्रणालीमध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपडेट झाल्यानंतर नोंद झालेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे, नाव, किंवा लिंग, जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेच्या संच मान्यता करिता ग्राह्य धरण्यात यावे, ज्या विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकसाठी नोंदणी केली आहे, परंतु अद्याप पर्यंत आधार क्रमांक मिळालेला नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असून, हे विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे व संच मान्यतेसाठी आधारची सक्ती करू नये अशी मागणी शिक्षक नेते सुनिल गाडगे. माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष  आप्पासाहेब जगताप अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा  आशा मगर, सोमनाथ बोंतले,  जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे,  जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष  रामराव काळे . जिल्हा सचिव महेश पाडेकर. योगेश हराळे, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी .  हनुमंत रायकर,  नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख. संजय पवार, संतोष देशमुख,  किसन सोनवणे,  कैलास जाधव,  संतोष शेंदुरकर,  संजय भुसारी, सिकंदर शेख, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे . रेवण घंगाळे जॉन सोनवणे .महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी केली आहे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here