संजीवनी ज्यु. कॉलेजचा बास्केटबॉल संघ तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम

0

शैक्षणिक  गुणवत्तेबरोबरच संजीवनीमध्ये खेळालाही महत्व
कोपरगांव: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व कोपरगांव तालुका क्रीडा समिती यांच्यामार्फत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या भव्य मैदानावर नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बास्केटबॉल स्पर्धांमध्ये संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या संघाने अंतिम फेरीत समता इंटरनॅशनल  स्कूलच्या संघाविरूध्द उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शन  करीत ३२- ०३ अशा  गुणांनी प्रतिस्पर्धी संघावर एकतर्फी विजय संपादित करत संजीवनी ज्यु. कॉलेज बास्केटबॉल खेळातही तालुक्यात अव्वल असल्याचे अधोरखित केले.

अशा  प्रकारे संजीवनी ज्यु. कॉलेज शैक्षणिक  गुणवत्तबरोबरच खेळालाही महत्व देते, हे पुन्हा एकदा सिध्द केले आहे, अशी  माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
            पत्रकात पुढे म्हटले आहे की १९ वर्षे  वयोगटांतर्गत झालेल्या चुरशीच्या  स्पर्धेत संजीवनी ज्यु. कॉलेजच्या संघाने उपांत्य फेरीत महर्षी  विद्यामंदीर ज्यु. कॉलेजच्या संघाविरूध्द २२- १७ गुणांनी विजय मिळवित थेट अंतिम फेरीत धडक मारली. संजीवनी ज्यू. . कॉलेजच्या संघात श्रेयश  चंद्रशेखर काजळे, अलीमोहम्मद फिरोज शेख, अथर्व योगेश  जपे, ओम अशोक  जाधव, अथर्व शरद मापारी, आदर्श  गणेश  रहाणे, रोहन नितीन चव्हाण, साईराज विशाल  पवार, स्पंदन राहुल अमृतकर, आदित्य बाळासाहेब खर्डे व अथर्व भागवत पानगव्हाणे यांनी उत्कृष्ट  खेळ करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे  पारणे फेडले.

आता हा संघ संगमनेर येथे दि. १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या  जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये कोपरगांव तालुक्याचे नेतृत्व करणार आहे. तेथेही जिंकायचेच, या जिध्दीने सर्व खेळाडू क्रीडा प्रशिक्षक  डॉ. गणेश  नरोडे, प्रा. अक्षय येवले व प्रा.  शिवराज पाळणे यांच्या मार्गदर्शनाखाली  बास्केटबॉल खेळाचा सराव करीत आहेत.
         विद्यार्थी खेळाडूंच्या या सततच्या यशाबध्दल संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले असुन त्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंडगे  व सर्व क्रीडा प्रशिक्षकांचेही अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here