संभाजी नगरच्या बौद्ध लेणीच्या बचाव महामोर्चात एकवटले लाखो बौद्ध आंबेडकरी कार्यकर्ते 

0

बुलडाणा,(प्रतिनिधी)- 

छत्रपती संभाजी नगर औरंगाबाद येथील बौद्ध लेणी च्या पायथ्याशी मागील ६० ते ७० वर्षांपासून असलेले विपश्यना बुद्ध विहार व भिक्खु कुटीस अतिक्रमण असल्याचे संबोधून बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या वतीने भारतीय न्याय संहितेच्या कलम १६८ प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्याने आंबेडकरी अनुयायी ७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता संभाजी नगर येथील क्रांती चौकातून लाखों बौद्ध आंबेडकरी अनुयायी अखिल भारतीय भीक्खु संघाच्या नेतृत्वात  बौद्धलेणी बचाव मोर्चात सर्व आंबेडकरी पक्ष संघटना गट तट विसरून सहभागी झाले होते हा मोर्चा ऐतिहासिक ठरला या महामोर्च्यात किमान 2 लाख लोक सहभागी झाल्याचे दिसत होते. 

जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असणाऱ्या औरंगाबाद/ छ. संभाजीनगर येथील बौद्ध लेण्यांच्या सोबतच पायथ्याशी असलेल्या विपश्यना बुद्ध विहार येथे मागील ६० ते ७० वर्षांपासून बौद्ध अनुयायी श्रद्धेने नतमस्तक होतात. लेण्यांची निर्मितीपासून पायथ्याशी बौद्ध भिक्खू चे वास्तव्य येथे राहिले असल्याने अनेक श्रद्धावान उपासक, लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून, सहभागातून बौद्ध विहार, भिक्खू कुटी, सभा मंडप व विविध सुविधांनी परिसराचा विकास करण्यात आला आहे.

 

मुळात हजारो वर्षापासून बौद्धलेणी असताना पायथ्याच्या जागेची मालकी विद्यापीठाची कशी असेल असा प्रश्न उपस्थित करत याची शहानिशा न करता बौद्धांच्या या ऐतिहासिक स्थळाला हटविण्याच्या मनुवादी सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी ‘बौद्ध लेणी बचाव मोर्चा’ तुन आपल्या या अस्तित्वाच्या, स्वाभिमानाच्या, अस्मितेच्या लढ्यात आंबेडकरी लाखो बौद्ध आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. 

हा मोर्चा क्रांतिचौक येथून निघून पैठण गेट- टिळक पथ- गुलमंडी – सिटीचौक- म.गांधी पुतळा शहागंज – हर्ष नगर विभागीय आयुक्त कार्यालय, छ. संभाजीनगर औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन सभेद्वारे विसर्जित झाली भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर व भिक्खू संघाच्या यांनी नेतृत्त्वात लाखोंच्या संखेने बौध्द अनुयायी विविध संघटनांचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बुध्द लेणी के सन्मान मे, हम सब एक है, युध्द नको बुध्द हवा, जो हमसे टकरायेगा वो मिटीमे मिलजायांगा, लेणी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची आशा जोरदार घोषणाबाजी करत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचशिल ध्वज, गळ्यात निळा रूमाल, हातात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, संविधानाची प्रत घेऊन तरूण तरूणी या महामोर्च्यात लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र सह भरातील बौद्ध भीक्खु या मोर्चात सहभागी झाले होते. 

लाखो आंबेडकरी अनुयायांनी मोर्चातून आयुक्ताना निवेदनाव्दारे खालील प्रमुख मागण्याचे निवेदन दिले.  बौद्धलेणीच्या पायथ्याशी पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी ५० एकर जागा देण्यात यावी,बौद्ध लेणी व परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किट मध्ये करण्यात यावा,बौद्ध लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा, बौद्ध लेणीत पायाभूत सुविधा उभारून अजिंठा लेणी च्या धर्तीवर प्रकाशयोजना करून लेणीच्या डोंगराच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करावी,ऐतिहासिक अजिंठा लेणी मार्गावरील हर्सूल टी पॉईंट येथे भव्य बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात यावी,अजिंठा लेणी मार्गाचे रखडलेले काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे,महाराष्ट्रातील सर्व बौद्धलेण्यावरील इतर धर्मियांचे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात येऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्या सर्व बौद्ध लेण्यांचा बुद्धिस्ट सर्किट व तीर्थक्षेत्र- पर्यटन स्थळात समावेश करावा, चिकलठाणा विमानतळाला अजिंठा नाव द्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here