तालुक्यात विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित
जामखेड तालुका प्रतिनिधी
गेल्या १२ वर्षापासून जामखेड शहरामध्ये सालाबाद प्रमाणे २६ जानेवारी संविधान महोत्सव साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाचे आयोजन समस्थ भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये जामखेड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते . या वर्षीचा पत्रकारीते सलग १८ वर्षापासून सातत्याने प्रामाणिकपणे काम करत असलेले पत्रकार दिपक देवमाने यांना पुरस्कार देऊन आज २६ जानेवारी २०२५ रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
संविधान अमृत महोत्सव २०२५ दिला जाणारा पत्रकारितेचा पुरस्कार दीपक देवमाने यांना जाहीर झाला आहे. जामखेड शहरात बारावा संविधान अमृत महोत्सव आज २६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर बाजार जामखेड येथे साजरा होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन समस्थ भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात येणार आहे
या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती विधान परिषदेचे सभापती आ.प्रा. राम शिंदे तसेच कर्जत जामखेड चे आ. रोहित पवार, जामखेड चे तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव, यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील पुरस्कार देण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. प्रदीप कात्रजकर, शैक्षणिक क्षेत्रात बाळासाहेब पारखे, सामाजिक क्षेत्र कॅप्टन लक्ष्मण भोरे, साहित्यिक क्षेत्र लेखक गोकुळ गायकवाड, मधुकर महानुर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच नुकतीच जामखेड वकील संघटनेचे तालुकाध्यक्षपदी अॅड प्रमोद राऊत यांची निवड झाली आहे त्यांच्या निवडीबद्दल जाहीर सत्कार होणार आहे. विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व भारतीय संविधानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात येईल. या कार्यक्रमास आपण उपस्थित राहून भारतीय संविधानाचा सन्मान करावा असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी केले आहे.