छ. संभाजीनगर – समाजाचा सर्वांगीण विकास, अस्तित्व आणि अस्मिता यासाठी नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र,आमखास मैदान, छत्रपती संभाजीनगर येथे दोन सत्रात केडर कॅम्प घेण्यात आले. प्रथम सत्र अध्यक्ष लिडकॉमचे माजी चेअरमन मा.अशोक विजयकर,वर्धा तर द्वितीय सत्र अध्यक्ष राज्य उत्पादन शुल्कचे पो.नि. रमेश विठोरे, संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
समाजाचा सार्वजनिक व सर्वांगीण उन्नती तथा प्रगतीसाठी विधिध समित्या स्थापन करुन विविध बांधवांच्या नियुक्ती करण्यात आल्या. सदरील कॅम्प मध्ये दोन ठराव संमत करण्यात आले. 1) लोक सहभागातुन संत रविदास राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी 2024 रोजी संत रविदास यांची सार्वजनिक जयंती वेरुळ येथे साजरी केली जाईल.2) सामाजिक कृतज्ञता निधी समिती स्थापन करण्यात आली असुन इच्छुकांनी दरमहा 300/- रुपये द्यावे.
कॅम्प ला माजी.आ.बाबुराव माने-मुंबई,ज्येष्ठ समाजसेवक गोंविदराव खटावकर-सांगली, रघुवीर तुरेकर-मुंबई, अशोक आगावणे-सोलापुर, मीराताई शिंदे-अ.नगर, राजेंद्र बावस्कर-जळगाव, जगन्नाथ खाडे-मुंबई, अमर तांडेकर-यवतमाळ, राजेंद्र तांबेकर-अमरावती, नितीन भटकर-बुलढाणा, मनोज आहिरे, नाना शिंपी, प्रकाश आहिरे, देवलाल भगुरे, सुनिल डावरे, मनोज भदारणे- मुंबई, सत्यनारायण उनवणे, सुनिल खंडागळे, सचिन कांबळे, सहदेव खंडागळे- बीड, सतीश फतपुरे-जालना, अजय परसे- वाशिम, संजय भटकर,धनराज मोतीराय, विनोद बैरभैय्या, प्रकाश खुर्दे, चेतन मोतीराय, सुधीर तायडे- जळगाव, देविदास सुरंजे-धुळे, माणिक लव्हाळे, रविश्री.गोपीनाथ गाडे सपत्निक- अ.नगर , हिरालाल गतखणे, भाऊलाल निंभोरे, राम भगुरे, सुभाष बरोदे, गजानन नांदुरकर, मदन भगुरे, राजेंद्र गव्हाणे, दिलिप उमरे, किसन फुलमाळी, शांतीलाल लसगरे, विठ्ठल कडवे, नितीन लसगरे, सोपान वाढे, योगेश कडवे, योगीराज काकडे, राहुल भगुरे, अमोल रईवाले, शुभम सुरभैय्या, हरिश गल्हाटे, विकास भगुरे, बाळु सुरभैय्या, जगदिश सुरभैय्या- सर्व संभाजीनगर असे महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील प्रतिनिधिक स्वरुपात समाज बांधव उपस्थितीत होते.
सुत्रसंचलन प्रा.जयंत आहेर (नासिक) आणि प्रस्ताविक आभार विजय घासे अहमदनगर यांनी केले.सकल चर्मकार समाज या परिवारामध्ये सहभागी होण्यासाठी 8797870909 या हेल्पलाईन नंबर मॅसेज किंवा वॉटस्अप मॅसेज करावा.