समाजसेवा हेच कोल्हे कुटुंबीयांचे व्रत -स्नेहलताताई कोल्हे

0

संवत्सर व भोजडे येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या मोफत फिरत्या दवाखान्याचा अनेकांनी घेतला लाभ

कोपरगाव : कोल्हे कुटुंबीयांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत अखंड सुरू असून, माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आदर्श तत्त्वांवर वाटचाल करत असताना कोपरगाव मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व विकासाचे विविध प्रश्न सोडविण्यावर नेहमीच भर दिला आहे. मतदारसंघातील जनतेचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी कोल्हे परिवार रुग्णसेवेचा वारसा अविरत चालवत असून, त्याचाच एक भाग म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने ‘मोफत फिरता दवाखाना’ सुरू करण्यात आलेला आहे. त्याचा लाभ गरजू नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना शहरात महागड्या रुग्णालयात जाऊन औषधोपचार घेणे परवडत नाही. त्यामुळे त्यांना दर्जेदार व मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मरणार्थ संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘मोफत फिरता दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी (२२ सप्टेंबर) कोपरगाव तालुक्यातील संवत्सर व भोजडे येथे हा ‘मोफत फिरता दवाखाना’ ग्रामस्थांच्या सेवेत उपलब्ध करण्यात आला. माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी या मोफत फिरत्या दवाखान्याला भेट देऊन रुग्णांशी व ग्रामस्थांशी संवाद साधला. अनेक रुग्णांनी या फिरत्या दवाखान्याला भेट देऊन मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक ज्ञानेश्वरबापू परजणे, बापूसाहेब बारहाते, बाळासाहेब पानगव्हाणे, राजेंद्र भाकरे, विजय काळे, लक्ष्मणराव साबळे, महेश परजणे, राजेंद्र परजणे, रामचंद्र कासार, किशोर परजणे, गोविंद परजणे, भाजप दिव्यांग मोर्चाचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे, दिलीपराव कासार, प्रकाश बारहाते, योगेश परजणे, शिवाजीराव दैने, राजेंद्र बोरणारे, अजय शिंदे, बाळासाहेब खाजेकर, भाऊसाहेब शिंदे, शांताराम शिंदे, रवी तिरमिखे, चांगदेव भोसले, ह. भ .प पावडे बाबा, रवटे बाबा, चंद्रकांत ससाणे, चिमाजी दैने, अप्पासाहेब रानोडे, अण्णासाहेब निरगुडे, बाळासाहेब भोसले, राजेंद्र वाकचौरे, कारभारी शिंदे, भानुदास गांधिले, प्रकाश सोमासे, अनिल भाकरे, गणेश साबळे, किरण निरगुडे, गोरख कवडे, शिवाजी खर्डे, शुभम भोसले, चांगदेव भोसले, सागर भोसले, दिनकर बोरणारे, सचिन शेटे, शांताराम खरोसे, साहेबराव सोनवणे, अंबादास सोनवणे, राजेंद्र भोकरे, अनुप शिंदे, प्रकाश गायकवाड, बाळासाहेब सिनगर, रंगनाथ सिनगर, कैलास धट, देवराम मचरे, साहेबराव सिनगर, प्रमोद सिनगर, शहाराम सिनगर, अशोक सिनगर, वाल्मीक बोर्डे, बाळासाहेब सोनवणे, गंगाधर वाबळे, महेंद्र सिनगर, विजय सिनगर, दत्तात्रय सिनगर, प्रकाश भाकरे, रामराव गिरे आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोफत फिरत्या दवाखान्यात डॉ. सुजित सोनवणे यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वितरण केले.   

संजीवनी युवा प्रतिष्ठानने सुरू केलेल्या या मोफत फिरत्या दवाखान्यातून आजपर्यंत हजारो रुग्णांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. या उपक्रमांतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अत्याधुनिक फिरत्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांची थेट त्यांच्या निवासाच्या परिसरात जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करून उपचार केले जात आहेत. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आपल्या गावातच मोफत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी विवेक कोल्हे व कोल्हे कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here