सरपंच पतीचा हस्तक्षेप थांबविण्याची मागणी

0

पैठण,दिं.११.(प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये सरपंच पतीच्या हस्तक्षेप थांबविण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील हूड यांनी पैठण पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे यांना शुक्रवार दिं..११ रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

 दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच न येता त्यांचे पती मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करतात त्यांच्या हस्तक्षेपामुळे गावकरी व कर्मचारी यांना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते तसेच त्यांच्या हस्तक्षेपामुळे ग्रामपंचायत मध्ये कुठल्याही प्रकारची एक सुत्रता दिसत नाही. मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभाचे व सार्वजनिक लाभाबाबतचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात धुळखात पडून असून याकाची तात्काळ डिमांड करून शासनाकडे निधीची मागणी करण्यात यावी.

मंजूरी अभावी प्रलंबित असलेले प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावे . तसेच लाभार्थ्यांना शासकीय गायरान जमीनीवर घरकुल बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. असेही निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील हूड यांची स्वाक्षरी आहे.

———

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here