सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी 

0

कोपरगाव – दि. ७ सप्टेंबर २०२३

             माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी समाजकारणांसह सर्वधर्मसमभावातुन पारंपारिक सण, उत्सव साजरे करतांना जपलेला सलोखा महत्वाचा असुन त्यात सर्व भक्तांचा सहभाग प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी केले.

             संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या संकल्पनेतुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीहनुमान मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी बाजीराव सुतार या उभयतांच्या हस्ते विधीवत जन्म सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. 

           या सोहळ्यास कारखाना कॉलनीतील समस्त भाविक भक्त, महिला, अबालवृध्द तसेच भजनी मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी लाहया, सुंटवडा प्रसाद वाटप करण्यांत आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here