कोपरगाव : नायलॉन/चिनी धागा (मांजा) यामुळे जिवीतहानी होत असून पतंग उत्सव प्रेमींनी साधा पारंपरिक धागा वापरून पतंग उडवून उत्सवाचा आनंद टिकवावा.असे आवाहन स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके यांनी केले आहे.
मकर संक्रांतीनिमीत्त होणाऱ्या पतंग उत्सवा दरम्यान काही उत्साही पतंग प्रेमी कडून नायलॉन धागा वापरण्याची शक्यता असते. यामुळे मनुष्य, पशु-पक्षी यांना दिर्घकाळ गंभीर दुखापत दिर्घकाळ रहाते.सुज्ञनागरिक म्हणुन तरूणांनी तसेच पतंगबाजीची आवड असणाऱ्या लहान मुलांच्या पालकांनी या अभियानात सहभागी होऊन साधा पारंपारीक धागा वापरून उत्सवाचा आनंद टिकवावा.असे आवाहन केले आहे.तसेच पतंग यावर स्वच्छता, बेटी बचाओ बेटी पढाओ, जल संवर्धन, झाडे लावा- झाडे जगवा असे सामाजिक संदेश लिहून प्रबोधन कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे…